खबरदार ! मॉल, मंडईत रेंगाळल्यास पोलिस करणार दंड

कोरोना महामारीच्या पाश्र्वभूमीवर लॉकडाऊन करण्यात आला आहे. त्यामुळे अत्यावश्यक सेवेतील दुकाने वगळता इतर दुकाने आणि आस्थापना बंद आहेत. भाजीमंडई, किराणा दुकाने, तसेच किराणा विक्री होत असलेल्या मॉल सकाळी सात ते अकरापर्यंत खुले ठेवण्यास परवानगी आहे. त्यानुसार दररोज केवळ चार तास दुकाने खुली राहतात. कमी वेळेत आवश्यक खरेदी करून गर्दी होणार नाही, याची खबरदारी सर्वच नागरिकांनी घेणे आवश्यक आहे. मात्र काही नागरिक मॉल आणि भाजीमंडईत तासनतास रेंगाळतात.

    पिंपरी : खरेदीच्या बहाण्याने घराबाहेर पडून मॉल आणि भाजीमंडईत ग्राहक रेंगाळत असल्याचे दिसून येते. अशा ग्राहकांवर यापुढे कारवाई करण्यात येणार आहे. त्यांच्याकडून दंड वसूल केला जाईल, असे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी सांगितले.

    कोरोना महामारीच्या पाश्र्वभूमीवर लॉकडाऊन करण्यात आला आहे. त्यामुळे अत्यावश्यक सेवेतील दुकाने वगळता इतर दुकाने आणि आस्थापना बंद आहेत. भाजीमंडई, किराणा दुकाने, तसेच किराणा विक्री होत असलेल्या मॉल सकाळी सात ते अकरापर्यंत खुले ठेवण्यास परवानगी आहे. त्यानुसार दररोज केवळ चार तास दुकाने खुली राहतात. कमी वेळेत आवश्यक खरेदी करून गर्दी होणार नाही, याची खबरदारी सर्वच नागरिकांनी घेणे आवश्यक आहे. मात्र काही नागरिक मॉल आणि भाजीमंडईत तासनतास रेंगाळतात. त्यामुळे मॉल, मंडई आणि दुकानांमध्ये गर्दी झाल्याचे दिसून येते. यातून कोरोना विषाणूंचा प्रसार होण्याची शक्यता असते. तसेच फिजिकल डिस्टन्सिंगचेही उल्लंघन होते. इतर ग्राहकांना खरेदीला पुरेसा वेळ मिळत नाही. या प्रकारांना आळा घालण्यासाठी पोलीस आणि महापालिका यांच्याकडून उपाययोजना केल्या जात आहेत. त्यानुसार मॉल, मंडईत ग्राहकांना टोकन देण्यात येईल. त्यावर वेळ नमूद असेल. त्यानंतर मॉल, मंडईत अध्र्या तासापेक्षा जास्तवेळ रेंगाळणाNया ग्राहकांकडून ५०० रुपये दंड वसूल करण्यात येईल, असे कृष्ण प्रकाश यांनी सांगितले.