भक्ती-शक्ती उड्डाणपूलाखालून भुयारी मार्ग करून द्यावा; भारतीय जनता युवा मोर्चाची मागणी

भक्ती शक्ती चौक येथील प्राधिकरण पोलिस चौकी येथे येऊन रस्ता ओलांडावा लागत आहे. त्यामुळे शालेय विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, महिला आदींची धावपळ होते - सचिन काळभोर

पिंपरी: भक्ती-शक्ती उड्डाणपूलाखालून निगडी गावठाण येथे भुयारी पादचारी मार्ग उपलब्ध करून देण्यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने प्रयत्न करावेत, अशी मागणी सचिन काळभोर (भारतीय जनता युवा मोर्चा, उपाध्यक्ष) यांनी केली आहे. नागरिकांना रस्ता ओलांडून जाण्यासाठी कसरत करावी लागत आहे. भक्ती शक्ती चौक येथील प्राधिकरण पोलिस चौकी येथे येऊन रस्ता ओलांडावा लागत आहे. त्यामुळे शालेय विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, महिला आदींची धावपळ होत असल्याचे सचिन काळभोर म्हणाले.

या परिसरात असलेल्या मॉडर्न शाळा, माता अमृतानंदमयी शाळा, एस पी एम शाळा, विद्या भवन शाळा, सरकारी हॉस्पिटल, पोलीस स्थानक, आदी ठिकाणी जाण्यासाठी पर्यायी रस्ता महानगरपालिकेने उड्डाणपूलाखालून दिलेला नाही. त्यामुळे महानगरपालिका प्रशासनाने भक्ती शक्ती उड्डाणपूलाखालून रस्ता ओलांडून देण्यासाठी भुयारी मार्ग उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली आहे.