भोर,वेल्हे यावर्षी पर्यटकांसाठी बंद

भोर : भोर,वेल्हे तालुक्यातील गड, किल्ले,धरणे,धार्मिक स्थळे पावसाळा सुरू झाला की पावसाळ्यात पर्यंटकांना दरवर्षी खुणावतात.पाउस सुरू झाला की मोठया संख्येने पर्यटक तेथे गर्दी करतात. मात्र या वर्षी

भोर : भोर,वेल्हे तालुक्यातील गड, किल्ले,धरणे,धार्मिक स्थळे पावसाळा सुरू झाला की पावसाळ्यात पर्यंटकांना दरवर्षी खुणावतात.पाउस सुरू झाला की मोठया संख्येने पर्यटक तेथे गर्दी करतात. मात्र या वर्षी करोनाच्या पार्श्वभूमीवर या ठिकाणांवर पर्यटनासाठी बंदचे आदेश उपविभागीय अधिकारी राजेंद्र जाधव यांनी गुरूवारी काढले आहेत. त्यामध्ये भोरमधील भाटघर, निरा देवघर धरणे, नेकलेस पॉईंट, वरंधा,अंबाडे घाट, राजवाडा,बनेश्वर भोरश्वर, नागेश्वर मंदीरे, झुलता पुल, रायरेश्वर पठार, केंजळ व विचित्र गड तर वेल्हयातील तोरणा,राजगड किल्ले,मढे व पाबे घाट,गुंजवणी धरण, अनेक ठीकाणी पाण्याचे धबधबे आदींचा समावेश आहे. या ठिकाणी अनेकदा अपघात होतात. तरूणांईकडून हुल्लडबाजी, मदयपानासारखे प्रकार घडतात.त्यामुळे गुन्हे वाढून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो. यावर्षी पर्यटकांमुळे करोनाचा धोका वाढण्याचा धोका असल्याने प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून पर्यटकांना दोन्ही तालुक्यातील सर्व ठिकाणांवर बंदी घातली आहे. या आदेशाचे उल्लघंन केल्यास आपत्ती व्यवस्थापन कायदयान्वये गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत.