भोर, वेल्हयातील वीज पुरवठा सुरू

भोर : बुधवारी झालेल्या निसर्ग वादळामुळे खंडीत झालेला भोर तालुक्याच्या ग्रामीण भागातील वीज पुरवठा शुक्रवारी सर्व ठीकाणी सुरू झाल्याची माहीती उपअभियंता संतोष चव्हाण यांनी दिली.

 सलग तीन दिवस काम

 
भोर : बुधवारी झालेल्या निसर्ग वादळामुळे खंडीत झालेला भोर तालुक्याच्या ग्रामीण भागातील वीज पुरवठा शुक्रवारी सर्व ठीकाणी सुरू झाल्याची माहीती उपअभियंता संतोष चव्हाण यांनी दिली. बुधवारच्या वादळ व पावसामुळे  भोर उपविभागांर्गत एकशे बावन्न गावातील चौदा  उच्च दाब वाहिन्या, सातशे अडसष्ट रोहित्रे नादुरुस्त झाल्यामुळे अठ्ठावीस हजार सहाशे ग्राहकांचा विद्युत पुरवठा खंडित झाला होता.त्यापैकी गुरूवारी एकशे आकरा गावातील पंचवीस हजार ग्राहकांचा वीजपुरवठा सुरू केला.शुक्रवारी सदतीस गावातील तीन हजार पाचशे ग्राहकांचा वीज पुरवठा सुरू केला. ही गांवे अत्यंत दुर्गम भागातील होती. सासवड विभागाचे कार्यकारी अभियंता अरविंद वनमोरे यांच्या मार्गदर्शनाखाली आठ अभियंते व ८५ कर्मचाऱ्यांनी तीन दिवस हे काम केले.
          वेल्हे  तालुक्यात वादळ व पावसामुळे उच्च वाहीणीचे तेरा, लघु वाहीणीचे सतरा पोल पडले तर अनेक ठीकाणी वीज वाहत तारा तुटल्या. त्यामुळे तीन दिवस काम सुरू ठेउन वीजपुरवठा सुरळीत केल्याची माहीती उपकार्यकारी अभियंता शैलेश गिते यांनी  दिली.