बावधन येथील बिग-बास्केटचे गोडाऊन भीषण आगीत जाळून खाक ; जीवित हानी नाही

आग लागल्याचे लक्षात येताच नागरिकांनी तात्काळ ही माहिती अग्निशमन दलाला दिली. त्यावेळी आगीचे स्वरूप कमी होते. पण, काही क्षणातच आगीने उग्ररूप धारण केले. भडका उडाल्याने आग मोठ्या प्रमाणात पसरली आणि तिने गोडाऊनला विळखा घातला.

    पुणे: बावधन येथील बिग बास्केटच्या गोडाऊनला भीषण आग लागल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आगीत गोडाऊन खाक झाले आहे. सुदैवाने या घटनेत कोणत्याही प्रकारची जीवित हानी झालेली झालेले नाही. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाने घटनास्थळावर दाखल होता आग आटोक्यात आणली. आगीचे कारण मात्रअद्याप समोर आलेले नाही. आगाची तीव्रता इतकी होती की त्याचे लोळ मोठ्या प्रमाणात बाहेर पडत होते. तर प्रचंड धूर झाला होता.

    बावधन बुद्रुक येथे बिग बास्केटचे मोठे गोडाऊन आहे. बिग बास्केटमधून धान्य, भाजीपाला आणि खाद्यपदार्थ पुरवले जातात. त्याचे हे गोडाऊन आहे. येथे मोठ्या प्रमाणात माल ठेवला जातो.

    आग लागल्याचे लक्षात येताच नागरिकांनी तात्काळ ही माहिती अग्निशमन दलाला दिली. त्यावेळी आगीचे स्वरूप कमी होते. पण, काही क्षणातच आगीने उग्ररूप धारण केले. भडका उडाल्याने आग मोठ्या प्रमाणात पसरली आणि तिने गोडाऊनला विळखा घातला.
    तोपर्यंत पुणे महापालिका, पिंपरी चिंचवड अग्निशमन दल तसेच पीएमआरडीए व एमआयडीसी अश्या एकूण 12 फायरगाड्या येथे दाखल झाल्या. जवानांनी पाण्याचा माराकरून आग नियंत्रणात आणण्यास सुरुवात केली. पण, आग मोठ्या प्रमाणात असल्याने अथक प्रयत्न व मोठ्या प्रमाणात पाण्याचा माराकरून काही तासांनी ही आग आटोक्यात आणली गेली. पण, आगीत गोडाऊन जळून खाक झाले आहे. आगीत धान्य,भाजीपाला, किराणा सामान जळाला आहे. तर गल्यात ठेवलेले पैसेही जळाले आहेत.