राज्यात साखर साठ्याचे चालू वर्षी मोठे संकट

ऊस गळीत हंगाम १५ ऑक्टोबरपासून सुरू होणार
रांजणी: राज्यात लाखो टन साखर शिल्लक असताना येत्या गाळप हंगामात सुमारे शंभर लाख टन नवीन साखर तयार  होण्याची शक्यता आहे. राज्यात अभूतपूर्व साखर साठ्याची समस्या सोडवण्यासाठी यंदा उत्पादन किमान वीस लाख टनाने घटवण्याची व्युव रचना साखर संघाने केलेली आहे. चालू वर्षीच्या ऊस गळीत हंगाम १५ ऑक्टोबरपासून सुरू होत आहे. चांगल्या मान्सूनमुळे यंदा ऊस उत्पादनात आधीच्या अंदाजापेक्षा ८० ते ९० लाख टनाने वाढ होणार आहे. आधीचा अंदाज ८१५ लाख टनाचा होता तो यंदा८९० लाख टनांच्या पुढे जाईल उसाची उत्पादकता देखील हेक्टरी ७५ ते ८० टनांवरून ९० च्या आसपास राहू शकते. साखर उद्योगात सध्या आढावा बैठका सुरू आहेत.ऊस उपलब्धता आणि साखर साठा ही जास्त असल्याने गाळपाचे नियोजन पारंपरिक पद्धतीने झाल्यास मोठे आर्थिक संकट उभे राहील अशी भीती साखर कारखान्यांना वाटते. कारण आधीच्या ७२ लाख टनाच्या शिल्लक साठ्यात नव्या हंगामातील १०१ लाख टन साखरेची भर पडू शकते म्हणजेच पुढील एक वर्ष विकली जाईल इतकी साखर शिल्लक आहे त्यात पुन्हा दुपटीने भर पडणार आहे.

-सर्व आर्थिक नियोजन विस्कळीत होऊ शकते
भरमसाठ साखर निर्मितीमुळे साखर कारखान्यांसमोर यंदा आर्थिक संकट तयार होऊ शकत त्यामुळे प्रतिबंधात्मक उपाय म्हणून साखर कारखान्यांना यंदा साखर उत्पादन घटविण्यासाठी मिशन मोडवर काम करावे लागेल, असे महाराष्ट्र राज्य साखर संघाचे व्यवस्थापकीय संचालक संजय खताळ यांनी सांगितले.

यातून सर्व आर्थिक नियोजन विस्कळीत होऊ शकते असे साखर संघातील जाणकारांना वाटते. दरम्या यंदा चांगला पाऊस पडल्यान पाण्याच्या उपलब्धतेमुळ ऊसाची टनेज जादा मिळण्याची शक्यता आहे त्यामुळे साखरेच्या उत्पादनात मोठी वाढ होऊ शकते. पुणे विभागा यंदा उसाचे मोठ्या प्रमाणात क्षेत्र असल्यान साखरेचे उपलब्धता देखील पुणे विभागांमध्ये जास्त होईल असे अनेक राष्ट्रीय पातळीवर पुरस्कार मिळवलेल्य आंबेगाव तालुक्याती पारगाव येथी भिमाशंकर सहकार साखर कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब बेंडे यांनी सांगितले. मागील २०१९-२० च्या हंगामा ऊस गाळपाला ५४५ लाख टन ऊस होता त्यातून ६१ लाख टन साखर तयार झाली गेल्यावर्ष १४७ साखर कारखाने सुरू होते. चालू वर्षाच्या हंगामाची स्थिती मात्र २०१८- १९ च्या हंगामा सारखी आहे २०१८ मध्ये राज्यात ९५२ लाख टन ऊस होता यातून १०२ सहकारी आणि ९३ खाजगी कारखान्यांनी १०७  लाख टन  साखर तयार झाली होती. चांगल्या पावसामुळे यंदा गाळप ९०० लाख टनांच्या पुढे जाण्याची शक्यता आहे.