शाळा सुरु कारण्याबाबत  पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्तांचा मोठा निर्णय

पिंपरीमध्ये अद्यापही कोरोनाचा प्रभाव हवा तितकासा कमी झाला नसल्यानं येथील शाळा सुरु होणार नसून येत्या ३१ जुलै पर्यंत बंदचा राहणारआहेत, अशी माहिती महानगरपालिका आयुक्तांनी दिली आहे.

    पिंपरी: कोरोनाच्या संसर्गाला सुरुवात झाल्यापासून देशभरातील शाळाबंदच आहेत. शाळांबंद असल्यातरी मुलांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी ऑनलाईन शिक्षाणाची व्यवस्था करून देण्यात आली आहे. मात्र कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रभाव कमी झाल्यानंतर अनेक या ठिकाणी शाळा सुरु करण्याबाबतचा निर्णय राज्यसरकारच्या शालेय शिक्षण विभागानं घेतला आहे.

    परंतु ज्या गावांमध्ये एकही कोरोनाचा रुग्ण आढळलेला नाही. अशाच गावाममध्ये शाळा सुरु केल्या जाणार आहेत. त्याप्रमाणे राज्यातील काही गावांमध्ये शाळा सुरु झालेल्या आहेत. परंतु पिंपरीमध्ये अद्यापही कोरोनाचा प्रभाव हवा तितकासा कमी झाला नसल्यानं येथील शाळा सुरु होणार नसून येत्या ३१ जुलै पर्यंत बंदचा राहणारआहेत, अशी माहिती महानगरपालिका आयुक्तांनी दिली आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील सर्व शाळा 31 जुलैपर्यंत बंद राहणार असल्याचं परिपत्रक पालिका आयुक्त राजेश पाटील यांनी काढले आहे.