पुण्यात नवले पुलाजवळ विचित्र अपघात, भरधाव ट्रकने ८ वाहनांना दिली धडक

शनिवारी सकाळी साडे सात ते 8 वाजेच्या सुमारास नवले पुलाजवळ हा विचित्र अपघात घडला. मुंबई बंगळुरू महामार्गावर एका ट्रक चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने समोर असणाऱ्या वाहनांना धडक दिली. या विचित्र अपघातात एकूण आठ वाहनांचे नुकसान झाले आहे.

    पुणे : पुण्यात (pune) ट्रकचालकाचे नियंत्रण सुटल्याने वडगाव बुद्रूकच्या नवले पुलानजीक हायवेवर विचित्र अपघात झाला आहे. या अपघातात एका जणाचा मृत्यू झाला आहे. तर 3 जण जखमी झाले आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी सकाळी साडे सात ते 8 वाजेच्या सुमारास नवले पुलाजवळ हा विचित्र अपघात घडला. मुंबई बंगळुरू महामार्गावर एका ट्रक चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने समोर असणाऱ्या वाहनांना धडक दिली. या विचित्र अपघातात एकूण आठ वाहनांचे नुकसान झाले आहे.

    हा अपघात इतका भीषण होता की, यात रिक्षांचा चक्काचूर झाला तर कारचे मोठे नुकसान झाले आहे. या अपघातात एकाचा मृत्यू झाला असून तीनजण जखमी झाले आहेत.