बंगालमध्ये भाजपकडून सत्तेचा गैरवापर ; शरद पवार यांची टीका

सध्या पाच राज्यामध्ये विधानसभा निवडणुका लागल्या आहेत. यापैकी केवळ आसाममध्ये भाजप सत्ता राखण्यात यशस्वी होईल.मात्र केरळ, तमिळनाडू, पश्चिम बंगाल इतर पक्षांना यश मिळेल. केरळमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासह डावे पक्ष एकत्र आले आहेत. तसेच तेथील सत्ता देखील डाव्यांच्या हातात आहे. त्यामुळे केरळमध्ये पुन्हा डाव्यांचे सरकार येईल. तर तमिळनाडूमधील लोकांचा कल स्टॅलिन व त्यांचा पक्ष डीएमके यांच्या बाजूने आहे. त्यामुळे तेथे डिएमकेची सत्ता येईल.

  बारामती : पश्चिम बंगालमध्ये भाजपकडून सत्तेचा गैरवापर होत असून बंगालमधील बंगाली संस्कृतीवर आघात करण्याचा प्रयत्न कोणी केला तर सबंध बंगाल एकसंध होतो. बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखाली सरकार येईल, याची मला खात्री असून आसाम वगळता अन्य राज्यात भाजपचा पराभव होईल, असे सूतोवाच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी बोलताना केले .माळेगाव (ता. बारामती ) येथे गोविंदबाग या निवासस्थानी शरद पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

  यावेळी पवार म्हणाले, सध्या पाच राज्यामध्ये विधानसभा निवडणुका लागल्या आहेत. यापैकी केवळ आसाममध्ये भाजप सत्ता राखण्यात यशस्वी होईल.मात्र केरळ, तमिळनाडू, पश्चिम बंगाल इतर पक्षांना यश मिळेल. केरळमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासह डावे पक्ष एकत्र आले आहेत. तसेच तेथील सत्ता देखील डाव्यांच्या हातात आहे. त्यामुळे केरळमध्ये पुन्हा डाव्यांचे सरकार येईल. तर तमिळनाडूमधील लोकांचा कल स्टॅलिन व त्यांचा पक्ष डीएमके यांच्या बाजूने आहे. त्यामुळे तेथे डिएमकेची सत्ता येईल.आसाममध्ये भाजपचे राज्य आहे. त्यामुळे आसामध्ये इतर राजकिय पक्षांपेक्षा भाजपची स्थिती चांगली आहे. त्यामुळे भाजपला यश मिळेल,असा विश्वास पवार यांनी यावेळी व्यक्त केला.

  शेतकरी आंदोलनाला शंभर दिवस

  उलटून सुद्धा शेतक-यांना खलिस्थानी, दहशतवादी संबोधत असतील तर यावर काय भाष्य करणार असा सवाल करून पवार म्हणाले, शेतक-यांच्या भूमिके संदर्भात केंद्र सरकारने सामंजस्याची भूमिका न घेतल्यामुळे संसदेचे कामकाज बंद पडले. या प्रश्नावर शेतकरी जसे अस्वस्थ आहेत. तसेच संसद देखील अस्वस्थ आहे. त्यामुळे याबाबतची प्रतिक्रिया उद्याच्या कामकाजात नक्की उमटेल अशी आशा आहे.

  घटनेची जबाबदारी न पाळणारा राज्यपाल : शरद पवार

  घटनेनुसार राज्यसरकारने केलेल्या शिफारशींना मान्याते देणे ही जबाबदारी राज्यपालांची असते. महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये लोकशाहीची आणि घटनेची
  जबाबदारी न पाळणारा राज्यपाल कधी पाहिला नाही. हा चमत्कार सध्याच्या राज्यपालांनी केला, ही दुर्दैवी गोष्ट आहे, असा टोला ज्येष्ठ नेते शरद
  पवार यांनी राज्यपाल भगतसिंह कोशारी यांना लगावला.