भाजपचे पदाधिकारी ईस्टेट एजंट ; राष्ट्रवादी काँग्रेसचा आरोप

पुणे महानगरपालिकेच्या हद्दीतील रस्ता रुंदी व अन्य विकास प्रकल्पबाधितांचे शहराच्या मोक्याच्या जागी ३८ इमारतींमध्ये २१९९ सदनिकांमध्ये अनेक वर्षांपूर्वी स्थलांतर करण्यात आले. आता या जागा त्यांच्या नावावर करण्याचा पुणे महानगरपालिकेच्या गोंडस प्रस्तावामुळे भविष्यात बिल्डर या जागा रिडेव्हलप करून सध्याच्या सदनिकाधारकांना पुन्हा अन्य जागी स्थलांतरित करून मोठा मलिदा लाटतील असा आराेप काॅंग्रेसचे गटनेते आबा बागुल यांनी केला आहे.

    पुणे : महापािलकेच्या मालकीच्या सदनिकांची विक्री करण्याचा निर्णय हा बांधकाम व्यावसाियकांच्या फायद्यासाठी घेतला जात आहे. यात काेट्यावधी रुपयांचा गैरव्यवहार हाेण्याची शक्यता आहे. यामुळे राष्ट्रवादी काॅंग्रेसचा विराेध असल्याची माहीती शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी दिली. तसेच भाजपचे पदाधिकारी हे ईस्टेट एजंट झाल्याचा आराेपही जगताप यांनी केला.

    शहर सुधारणा समितीपाठाेपाठ स्थायी समितीने महापालिकेच्या ताब्यातील आणि भाडेतत्वावर दिलेल्या सुमारे १ हजार २६० सदनिका विकण्यास मंजुरी दिली आहे. या प्रस्तावाला राष्ट्रवादी काॅंग्रेसने फेरप्रस्ताव दाखल केल्याची माहीती जगताप यांनी दिली. महापािलकेची आर्थिकस्थिती चांगली असुन, बावीशे काेटी रुपयांच्या ठेवी आहेत. महापालिकेकडे आर्थिक दुर्बल घटक आणि आर सेवन या तरतुदीनुसार तीन हजाराहून अधिक सदनिका ताब्यात आल्या आहेत. आर्थिक स्थिती चांगली नसल्याचा बनाव करून या सदनिका बांधकाम व्यावसाियकांच्या हितासाठी विक्रीला काढल्या जात आहे. यात काेट्यावधी रुपयांचा गैरव्यवहार हाेण्याची शक्यता आहे. बनावट कागदपत्रे तयार करून या सदनिका संबंधित बांधकाम व्यावसाियकच कमी किंमतीत म्हणजे रेडीरेकनरच्या दरानुसार खरेदी करण्याची शक्यता आहे. यामुळे महापािलकेचे माेठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान हाेणार आहे. महापािलकेतील सत्ताधारी भाजपचे पदाधिकारी हे ईस्टेट एजंट झाले असुन, ते पुणेकरांची फसवणुक करीत आहे असा आराेपही जगताप यांनी केला.

    -तर बिल्डर या जागा रिडेव्हलप करून मलिदा लाटतील : बागुल