Chief Minister Thackeray should disclose financial ties with Naik family Kirit Somaiya

पुणे जिल्हा मध्यवर्ती बँक ही तर लीड बँक आहे. महाविकास आघाडी सरकारने कितीही घोटाळा केला तरी महाराष्ट्र भ्रष्टाचारमुक्त करणार आणि सरकारला सळो की पळो करून सोडणार

  पुणे : महाविकास आघाडी सरकारमधील अजून एका मंत्र्याचा घोटाळा गणपती विसर्जनानंतर बाहेर काढणार आहे. गणपती विसर्जन झाले की मोठा धमाका होणार आहे’, आगे-आगे देखो होता है क्या, असे माजी खासदार किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी पुण्यात सांगितले.

  पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने आयोजित केलेल्या वार्तालाप कार्यक्रमात सोमय्या बोलत होते. यावेळी त्यांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका केली. ‘महाविकास आघाडी सरकार हे घोटाळे सरकार आहे’ असे सांगत त्यांनी,”दोन अनिल सापडले आहेत. तिसरा अनिल लवकरच सापडेल.” मात्र, हा तिसरा अनिल कोण? हे सांगण्यास त्यांनी नकार दिला.

  “मी पुढच्या आठवड्यात ठाकरे सरकारमधील कॅबिनेट मंत्र्याचा घोटाळा बाहेर काढणार आहे. आज बोललो असतो पण त्यांना गणपतीचा सण चांगला करु द्या, असे सांगत सोमय्या म्हणाले,”जरंडेश्वर कारखाना 65 कोटीत घेतला आणि कर्ज 700 कोटी घेतले, याला कर्ज फक्त 100 कोटी मिळू शकते.

  सरकारला सळो की पळो करून सोडणार

  पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेबद्दल त्यांनी भाष्य केले. ते म्हणाले, “पुणे जिल्हा मध्यवर्ती बँक ही तर लीड बँक आहे. महाविकास आघाडी सरकारने कितीही घोटाळा केला तरी महाराष्ट्र भ्रष्टाचारमुक्त करणार आणि सरकारला सळो की पळो करून सोडणार, असे ते म्हणाले.

  “मंत्री अनिल परब यांचे निकटवर्तीय असलेल्या बजरंग खरमाटे यांच्या चाळीस ठिकाणच्या संपत्तीची माहिती काढली आहे. त्यावर येणाऱ्या दोन ते तीन आठवड्यात पहिली ऍक्शन येईल, असेही ते म्हणाले. अनिल देशमुख व बजरंग खरमाटे यांची सर्व माहिती बाहेर येईल.

  नारायण राणेंवरील ‘त्या’ आरोपांवर सोमय्या गडबडले

  नारायण राणे यांच्यावर पूर्वी सोमय्या यांनी जोरदार आरोप केले होते. त्या आरोपावर आपण ठाम आहात का? असे विचारता सोमय्या गडबडून गेले.”हा विषय राज्याचा आहे. त्यावर राज्य सरकारने कारवाई करावी, असे उत्तर त्यांनी दिले. नारायण राणे यांच्याबद्दल त्यांना पत्रकार पुन्हा-पुन्हा विचारत होते. मात्र, सोमय्या राज्य सरकारकडे बोट दाखवत होते.