एक लाख रुपये, पाच दारूच्या बाटल्या आणि पाच बोकड, जातपंचायतीचा अजब दंड

पुणे जिल्ह्यातील मौजे गराडे (ता. पुरंदर) येथील रिटा कुंभार यांना जात पंचयातीने बहिष्कृत करून १ लाख रुपये, ५ दारुच्या बाटल्या, ५ बोकड असा दंड करुन एका प्रकारे खंडणीचं मागितली. या गंभीर प्रकरणासंदर्भात दखल घेऊन आज तातडीने पुण्याच्या पोलीस अधिक्षकांची भेट घेतली. यावेळी पुणे शहराध्यक्ष  माजी आमदार जगदिश मुळीक, सरचिटणीस संदिप लोणकर, प्रवक्ते संजय मयेकर आदि मान्यवर उपस्थित होते.

पुणे : पुणे जिल्ह्यातील गावामध्ये घडलेला जात-पंचायतीच्या निवाडयाचा प्रकार अतिशय दुदैर्वी आहे. पुरोगामी महाराष्ट्राला काळीमा फासणारी ही घटना आहे, त्यामुळे या गंभीर प्रकरणात  पोलिसांनी तातडीने तपास करून आरोपींना अटक करण्याची मागणी विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी आज केली.

पुणे जिल्ह्यातील मौजे गराडे (ता. पुरंदर) येथील रिटा कुंभार यांना जात पंचयातीने बहिष्कृत करून १ लाख रुपये, ५ दारुच्या बाटल्या, ५ बोकड असा दंड करुन एका प्रकारे खंडणीचं मागितली. या गंभीर प्रकरणासंदर्भात दखल घेऊन आज तातडीने पुण्याच्या पोलीस अधिक्षकांची भेट घेतली. यावेळी पुणे शहराध्यक्ष  माजी आमदार जगदिश मुळीक, सरचिटणीस संदिप लोणकर, प्रवक्ते संजय मयेकर आदि मान्यवर उपस्थित होते.

यानंतर प्रसिध्दी माध्यमांशी बोलताना दरेकर यांनी सांगितले की, कुंभार नावाच्या महिलेला समाजात सामावून घ्यायचे असेल तर त्यासाठी पाच बोकड, दारूच्या बाटल्या आणि एक लाखाचा दंड भरल्यावरच समाजात सामावून घेतले जाईल, अशा प्रकारची भूमिका जात पंचायतीने घेतली. जात पंचायत निवाडा देऊन मोकळे झाले. 

वडिलोपार्जित मालमत्तेमध्ये त्या महिलेला कुठल्याही प्रकाराचा हक्क राहणार नाही, असा थेट निवाडा जात पंचायतीत देण्यात आला. जे काम न्यायालय, पोलिस व राज्य सरकारचे आहे,  तेच काम जात पंचायतमार्फत करण्याचा दुदैर्वी प्रकार अजूनही येथे सुरु आहे, असेही दरेकर यांनी स्पष्ट केले.

राज्यांमध्ये २०१६ मध्ये सामाजिक बहिष्कारापासून प्रत्येक व्यक्तीचे संरक्षण करणारा कायदा अस्तित्वात आहे. परंतु दुर्दैवाने छोट्या मोठ्या प्रमाणात असे प्रकार आजही होत आहेत, जे आपल्या सामाजिक एकतेला धक्का देणारे आहेत, असे सांगतानाच दरेकर म्हणाले की, एका बाजूला वाडया वस्त्यांची जातिवाचक वाडयांची नावे बदलण्याचा सरकार निर्णय घेत असेल आणि दुस-या बाजूला पुरोगामी महाराष्ट्र म्हणून जेव्हा आपण ढोल पिटवतो तेव्हा या गोष्टी गांभीर्याने घेण्याची आवश्यकता आहे.

पुणे ग्रामीणच्या पोलिस अधिक्षकांची त्यांनी भेट घेतली. ते म्हणाले, गुन्हा दाखल झाला असून कुठल्याही परिस्थितीत आम्ही आरोपींना लवकरात लवकर शोधून आणून काढू. परंतु केवळ आरोपींना ताब्यात घेऊन हा प्रश्न सुटणार नाही तर २०१६ च्या कायद्याचे सामुदायिक सार्वत्रीकरण करण्याची आवश्यकता आहे. कारण अजूनही त्या समाजामध्ये कौन्सिलिंग करून हे जात पंचायत प्रकार अयोग्य आहेत. हे पटवून द्यावे लागेल.