‘त्या’ भाषणातलं  रंगलेले वाक्य अडचणीचं ठरलं ; भाजपचे विधान परिषद विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांच्यावर पुण्यात गुन्हा दाखल

भाजपचे विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी शिरूर येथे झालेल्या एका कार्यक्रमाच्या भाषणावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर टीका करताना "रंगलेल्या गालाचा मुका घेणारा पक्ष" आहे, अशी टीका केली होती. त्यामुळे मोठा वाद निर्माण झाला होता. दरम्यान लावणीसम्राज्ञी सुरेखा पुणेकर या पक्षात प्रवेश करणार असल्याच्या पार्श्वभूमीवर हे बेताल वाक्य केले असून, स्त्री म्हणून ते लज्जा उत्पन्न करणारे असल्याने चाकणकर यांनी याबाबत तक्रार केली होती.

    पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसवर टिका करताना महिलांबाबत केलेले विधान भाजपचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांना चांगलेच भोवले असून, त्यांच्यावर पुण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

    याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला प्रदेश अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी सिंहगड रोड पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार भादवी कलम ५०९ नुसार प्रवीण दरेकर यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, भाजपचे विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी शिरूर येथे झालेल्या एका कार्यक्रमाच्या भाषणावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर टीका करताना “रंगलेल्या गालाचा मुका घेणारा पक्ष” आहे, अशी टीका केली होती. त्यामुळे मोठा वाद निर्माण झाला होता. दरम्यान लावणीसम्राज्ञी सुरेखा पुणेकर या पक्षात प्रवेश करणार असल्याच्या पार्श्वभूमीवर हे बेताल वाक्य केले असून, स्त्री म्हणून ते लज्जा उत्पन्न करणारे असल्याने चाकणकर यांनी याबाबत तक्रार केली होती. त्यानुसार पोलिसांनी दरेकर यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.