कोथळा काढण्याच्या वक्तव्यावरुन भाजपची संजय राऊत यांच्या विरोधात पोलिसांत तक्रार, तक्रारीवर संजय राऊत म्हणतात..

“राऊत हे बोलू बहाद्दर आहेत. वादग्रस्त वक्तव करायचं, वादग्रस्त वक्तव्य लिहायचं, येवढंच त्यांचं काम आहे. जर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी या वक्तव्याची माफी मागितली नाही तर संजय राऊत यांना पुण्यात फिरून देणार नाही.” असा इशाराच मुळीक यांनी दिला आहे.

    पुणे – ‘शिवसेनेने आमच्या पाठीत खंजीर खुपसला’ असा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला होता. याच आरोपांना उत्तर देताना पुण्यातील एका सभेत खासदार संजय राऊत म्हणाले होते की, ‘आम्ही खंजीर खुपसत नाही तर समोरून कोथळा बाहेर काढतो.’ खासदार संजय राऊत यांच्या याच वक्तव्यावरुन आता पुण्यातील भाजपच्या कार्यकर्त्यांनी पुणे डेक्कन पोलिस स्थानकात तक्रार दाखल केली आहे.

    या संदर्भात बोलताना भाजपचे शहर अध्यक्ष जगदीश मुळीक म्हणाले की, “राऊत हे बोलू बहाद्दर आहेत. वादग्रस्त वक्तव करायचं, वादग्रस्त वक्तव्य लिहायचं, येवढंच त्यांचं काम आहे. जर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी या वक्तव्याची माफी मागितली नाही तर संजय राऊत यांना पुण्यात फिरून देणार नाही.” असा इशाराच मुळीक यांनी दिला आहे.

    दरम्यान, या तक्रारीसंदर्भात संजय राऊत यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. मुंबईत माध्यमांशी बोलताना राऊत म्हणाले की, “मी असं काय केलंय की त्यांनी तक्रार दाखल केली? कोणाचा कोथळा काढू म्हटलंय मी? चंद्रकांत पाटील म्हणत होते खंजीर खुपसला. मी फक्त येवढंच म्हटलं खंजीर खुपसण्याची परंपरा महाराष्ट्राची नाही. आपण समोरुन वार करतो. छत्रपती शिवाजी महाराजांनी समोरुन वार केले. त्यामुळे ते नक्की कोणावर गुन्हा दाखल करतायत ते पाहावं लागेल.”

    “त्यांना इतिहास माहिती नसेल तर आम्ही त्यांना शिवचरित्र वाठऊ. सेतुमाधवराव पगडी, बाबासाहेब पुरंदरे यांनी लिहिलेली चरित्र वाठऊ. त्याचा अभ्यासकरुन कोथळा काढणे म्हणजे नेमकं काय? हे समजून घ्यावं. आम्ही इतिहास घडवतो, तो चिवडत बसत नाही.”