ना मास्क, ना डिस्टनसिंग कोरोना नियमांची पायमल्ली करत डीजेच्या तालावर भाजप आमदार महेश लांडगे थिरकले ; पोलिसांकडून गुन्हा दाखल

मुलीच्या लग्न कार्यक्रमात कोरोना नियमांची पायमल्ली केल्याप्रकरणी अखेर मदार महेश लांडगेसह साठ जणांवर गुन्हा दाखल झालाय. या कार्यक्रमांचे जंगी नियोजन आखण्यात करण्यात आले होते. वाजंत्री, बैलजोड्या आणि बैलगाड्या सजविण्यात आलेल्या होत्या. तेंव्हा स्वतः आमदार लांडगे यांनी भंडाऱ्यात नाहून बेफाम नृत्य केले.

    पिंपरी चिंचवड: राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रभाव ओसरला असला तरी, मृत्यूच्या संख्येत अद्याप घाट झालेली नाही. संसर्गाचा धोकाटाळण्यासाठी राज्यात येत्या १५ जुनपर्यंत लॉकडाऊन वाढवण्यात आले आहे. मात्र सरकारच्या याच नियम पायमल्ली करत भाजप आमदार महेश लांडगे यांनी आपल्या मुलीच्या लग्नासाठी केलेल्या जाणाऱ्या मांडव डहाळेचा कार्यक्रम  कोरोना नियमांची पायमल्ली करत  पार पडला.

    या कार्यक्रमावेळी कोणत्याही प्रकारचा सोशल डिस्टनसिंग न पाळता , मास्कचार वापर न करता जल्लोषात कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमांचे जंगी नियोजन आखण्यात करण्यात आले होते. वाजंत्री, बैलजोड्या आणि बैलगाड्या सजविण्यात आलेल्या होत्या. तेंव्हा स्वतः आमदार लांडगे यांनी भंडाऱ्यात नाहून बेफाम नृत्य केले. या सोहळ्यात अपवाद वगळता आमदारांसह सगळेच विनामास्क वावरत होते.

    या जंगी कार्यक्रमाची कोणाला कानोकान खबर नव्हती. मात्र काही अतिउत्साही कार्यकर्त्यांनी सोशल मीडियावर हे व्हिडीओ शेअर केले. आता ते मिडियापर्यंत पोहचले नसते तर नवलच. अपेक्षेप्रमाणे त्याची बातमी झाली. व्हिडीओ पाहून आमदारांसह हितचिंतकांना धक्का बसला. त्यातच आमदार लांडगे यांच्या सोबत पालिकेचे अधिकारी सुनील बेळगावकर यांनी ही नृत्य केल्याचं समोर आलं आणि पालिका वर्तुळात चर्चेला आणखीनच उधाण आले.

    मुलीच्या लग्न कार्यक्रमात कोरोना नियमांची पायमल्ली केल्याप्रकरणी अखेर मदार महेश लांडगेसह साठ जणांवर गुन्हा दाखल झालाय. यात पिंपरी चिंचवड महापालिकेचे अधिकारी सुनील बेळगावकर हे पण डीजेच्या तालावर थिरकले असल्याचे समोर आले आहे. सामान्यांवर कारवाईचा बडगा उगरणारी पालिका अधिकारी बेळगावकर वर कारवाई करण्यासाठी एखाद्या तक्रारदाराची वाट पाहत आहे.

    भाजपचे शहराध्यक्ष पद असल्याने लांडगे ते शहरवासीयांना कोरोना नियम पाळावे, यासाठी अनेकदा जनजागृती करतात. मधल्या काळात तर ऑक्सिजनचा तुटवडा जाणवत होता. ते आमदारांनी प्रशासनाला धारेवर ही धरले लोकप्रतिनिधी म्हणून त्याने हे करायलाच हवे होते. पण मुलीच्या विवाहसोहळ्याप्रसंगी आयोजित कार्यक्रमात सर्व काही विसारल्याच दिसून आले . पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त आयर्नमॅन कृष्ण प्रकाश यांच्या कार्यक्षेत्रात कोरोना नियमांची ऐशीतैशी झाली. याच्या बातम्या प्रसारित होताच, आमदारांसह साठ जणांवर अखेर गुन्हा दाखल झाला.