एक सदस्यीय प्रभाग पद्धतीला भाजपचा विरोध

महापालिका निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाने एक सदस्यी प्रभाग पद्धती जाहीर केली आहे. भाजप खासदार गिरीश बापट यांनी या पद्धतीला विरोध केला आहे. आम्हाला बहु सदस्यीय प्रभाग पद्धतीच हवी आहे, असे बापट यांनी म्हटले आहे. आम्हाला चार सदस्यीय प्रभाग पद्धती हवी आहे. त्यामुळे एक सदस्यीय प्रभाग पद्धतीला आमचा विरोध आहे. हा सगळा राज्य सरकारचा निर्णय आहे, मंत्रिमंडळ काय निर्णय घेते ते बघू, असेही बापट यांनी म्हटले आहे.

    पुणे : महापालिका निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाने एक सदस्यी प्रभाग पद्धती जाहीर केली आहे. भाजप खासदार गिरीश बापट यांनी या पद्धतीला विरोध केला आहे. आम्हाला बहु सदस्यीय प्रभाग पद्धतीच हवी आहे, असे बापट यांनी म्हटले आहे. आम्हाला चार सदस्यीय प्रभाग पद्धती हवी आहे. त्यामुळे एक सदस्यीय प्रभाग पद्धतीला आमचा विरोध आहे. हा सगळा राज्य सरकारचा निर्णय आहे, मंत्रिमंडळ काय निर्णय घेते ते बघू, असेही बापट यांनी म्हटले आहे.

    दरम्यान, केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना बापट यांनी घरचा आहेर दिला. बापट म्हणाले की, राजकीय पक्षात मतभेद असतात. पण बोलताना पथ्य पाळले पाहिजे, त्यामध्ये सर्वच पक्षांचा समावेश आहे. मुख्यमंत्री असतील, नारायण राणे असतील यांनी आपआपली मते मांडायला हरकत नाही. पण अनेक गोष्टीत अडचणी दिसतात, मग त्याचे रूपांतर नको त्या गोष्टीत होते. हे सर्वांनी टाळले पाहिजे.