भाजपकडून चमकोगिरीसाठी गोरगरिबांच्या भावनांशी खेळ

”महापालिकेत सत्ताधारी भाजपकडून केवळ चमकोगिरी करण्यासाठी ठराव करून गरिबाच्या भावनांशी खेळ करण्याचा प्रयत्न केला जात आहेत. कोणतीही कायदेशीर तरतूद न पाहता, नियोजन न करता, योजना तयार न करता महासभा आणि स्थायी समितीची मान्यता मिळविण्यापूर्वी घोषणा केली. त्यानंतर ठराव करण्यात आला. गरिबांना मदत देण्याचा विषय चांगला होता. पण, कायदा न पाहता घोषणाबाजी करणे योग्य नाही. राज्य सरकार आणि आयुक्त यांना बदनाम करणे योग्य नाही. भाजपकडून स्वतःचे अपयश झाकण्याचा प्रयत्न केला जात आहे”

    पिंपरी : कोणतीही कायदेशीर तरतूद न पाहता, नियोजन, योजना तयार न करता महासभा आणि स्थायी समितीची मान्यता मिळविण्यापूर्वीच महापालिकेतील सत्ताधारी भाजपकडून गोरगरिबांसाठी आर्थिक मदतीची घोषणा केली. महापालिकेतील सत्ताधारी भाजपकडून चमकोगिरीसाठी गोरगरिबांच्या भावनांशी खेळ करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप शिवसेना गटनेते राहुल कलाटे यांनी केला. स्वतःचे अपयश झाकण्यासाठी राज्य सरकार, आयुक्तांना बदनाम करणे योग्य नाही, असेही ते म्हणाले.

    शहरातील आर्थिक दुर्बल घटकातील नागरिकांना अधिकार असतानाही आयुक्त जाणीवपूर्वक मदत करण्यास टाळाटाळ करत असल्याचा आरोप महापौर, सत्तारुढ पक्षनेत्यांनी केला आहे. त्यावर महापालिका अधिनियमाअंतर्गत थेट स्वरूपात आर्थिक मदत देण्याची तरतूद नाही. त्यामुळे शहरातील नागरिकांना ३ हजार रुपयांची मदत देण्याबाबत महापालिका अंमलबजावणी करू शकत नसल्याचा खुलासा आयुक्त राजेश पाटील यांनी केला आहे.

    याबाबत बोलताना शिवसेना गटनेते राहुल कलाटे म्हणाले, ”महापालिकेत सत्ताधारी भाजपकडून केवळ चमकोगिरी करण्यासाठी ठराव करून गरिबाच्या भावनांशी खेळ करण्याचा प्रयत्न केला जात आहेत. कोणतीही कायदेशीर तरतूद न पाहता, नियोजन न करता, योजना तयार न करता महासभा आणि स्थायी समितीची मान्यता मिळविण्यापूर्वी घोषणा केली. त्यानंतर ठराव करण्यात आला. गरिबांना मदत देण्याचा विषय चांगला होता. पण, कायदा न पाहता घोषणाबाजी करणे योग्य नाही. राज्य सरकार आणि आयुक्त यांना बदनाम करणे योग्य नाही. भाजपकडून स्वतःचे अपयश झाकण्याचा प्रयत्न केला जात आहे”