कर्जत येथे भाजपातर्फे  जिल्हा बँकेसमोर निदर्शने

कर्जत : शेतकऱ्यांना खरिपाचे कर्ज मिळावे, दिलेली कर्जमाफी प्रत्यक्षात मिळावी, बांधावर खते मिळावीत या मागणीसाठी कर्जत तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने जिल्हा सहकारी बँके समोर आंदोलन करण्यात

कर्जत : शेतकऱ्यांना खरिपाचे कर्ज मिळावे, दिलेली कर्जमाफी प्रत्यक्षात मिळावी, बांधावर खते मिळावीत या मागणीसाठी कर्जत तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने जिल्हा सहकारी बँके समोर आंदोलन करण्यात आले.

कर्जत तालुक्यात पावसाळा सुरू झाला तरी खरीप हंगामासाठीचे शेतकऱ्यांना पिक कर्ज वाटप ठप्प आहे. तसेच कर्जमाफी योजनेची अंमलबजावणी करण्यात आलेली नाही. महा विकास आघाडी सरकार राज्यात सात्तारुड झाल्यानंतर शेतकरी कर्जमाफीची मोठी घोषणा केली. महात्मा फुले कर्ज माफी योजने अंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा केले जातील. कोणत्याही शेतकऱ्यांना बँकेच्या अथवा सरकारी कार्यालयाच्या रांगेत उभे राहावे लागणार नाही . दोन लाख रुपयापर्यंत चे व दोन लाखाच्या वरच्या कर्जासाठी ओटीएस लागू करू व नियमित कर्ज भरणाऱ्यांना ५०००० रुपये प्रोत्साहनपर रक्कम देऊ. कर्जमाफी योजनेसाठी कोणत्याही अटी अथवा शर्ती लागू नसल्याचे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले .मात्र प्रत्यक्षात कर्जमाफीची यादी आलीच नाही जी आली त्यातील लाखो शेतकरी अजून वंचित आहेत. अशातच महाविकास आघाडी सरकारने २२ मे रोजी शासन आदेश काढत शासनाजवळ निधी नसल्याने शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम भरू शकणार नाही याची कबुली देऊन आणखीन शेतकऱ्यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला आहे. सोबत बँकांना शासनाच्या नावे कर्ज मांडावे असा आदेश काढला याला बँकांनी केराची टोपली दाखवत आणखीन शेतकऱ्यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला आहे. अवकाळी पाऊस दुष्काळ हमीभाव यामुळे तालुक्यातील शेतकऱ्याची वाईट अवस्था आहे अशा परिस्थितीमध्ये सरकारने शेतकऱ्यांचनां आधार म्हणून कांदा, तूर, चना आणि कापूस यांची हमी भावाने खरेदी करणे व शेतकऱ्यांचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होऊन अपेक्षित आहे. मात्र या सर्व गोष्टी होत नाहीत उलट पीककर्ज मागणाऱ्या शेतकऱ्यांचा बँकांमध्ये वारंवार अपमान करण्याचा प्रकार का घडत आहे? याचा खुलासा करावा. अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना हेक्टरी कोरडवाहू क्षेत्राला २५ हजार रुपये फळबागांना ५० हजार रुपये अशी मुख्यमंत्र्यांनी घोषित केलेले पैसे शेतकरी खात्यात कधी जमा होतील याची ही माहिती शेतकऱ्यांना मिळणे आवश्यक आहे. या प्रसंगी भारतीय जनता पार्टीचे जिल्हा सरचिटणीस प्रसाद ढोकरीकर, भाजपा ता.अध्यक्ष डॉ सुनील गावडे, सचिन पोटरे, भाजपा युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष विनोद दळवी, भाजपा युवा मोर्चाचे कर्जत तालुकाध्यक्ष ज्ञानदेव लष्कर,कर्जत तालुका भाजपा समन्वयक पप्पूशेठ धोदाड, आरपीआयचे तालुकाध्यक्ष संजय भैलुमे, ता.सरचिटनिस उमेश जेवरे, सरचिटनिस सुनिल नामदेव काळे, कर्जत जामखेड तालुका प्रसिद्धी प्रमुख गणेश पालवे, सुनील काका यादव, सुहास गावडे, भाजपा वैद्यकीय आघाडीचे अध्यक्ष नंदलाल काळदाते, राजेंद्र येवले, किसान आघाडीचे अध्यक्ष राहुल निंभोरे, प्रशांत आडसुळ, यांचेसह भाजपा चे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते त्यावेळी जिल्हा बँकेचे ता.विकास अधिकारी युवराज तनपुरे यांना निवेदन देण्यात आले बँकेचे शाखाधिकारी प्रदीप सातपुते उपस्थित होते