भाजपबाबत संजय राऊत यांचे मोठं विधान; म्हणाले…

शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीवर आहे. ही आपली पॉवर आहे.  तसेच शरद पवार आणि अजित पवार देखील आपलेच आहेत. दिलीप वळसे गृहमंत्री असतील. मात्र, शिवसेना सगळ्यांच्या वर आहे.

  नारायणगाव : छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थान असलेल्या शिवजन्मभूमी किल्ले शिवनेरीवरील माती शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अयोध्या येथे नेल्यानंतरच राम मंदिराच्या कार्याला वेग आला, असे प्रतिपादन शिवसेना (Shivsena) नेते खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केले.

  हे सरकार आपलंच

  आळेफाटा (ता. जुन्नर) येथे शिवसेना कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते. अपेक्षेप्रमाणे खा. राऊत यांनी आपल्या भाषणात राष्ट्रवादीसह काँग्रेसला देखील कोपरखळी मारली. राज्यात तीन पक्षांचे सरकार असलं तरी ज्यांचा मुख्यमंत्री असतो त्यांचे सरकार असते. त्यामुळे हे सरकार आपलं आहे.

  भाजपला अजूनही शिवसेनेची गरज

  शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीवर आहे. ही आपली पॉवर आहे.  तसेच शरद पवार आणि अजित पवार देखील आपलेच आहेत. दिलीप वळसे गृहमंत्री असतील. मात्र, शिवसेना सगळ्यांच्या वर आहे. भाजपला (BJP) अजूनही शिवसेनेची गरज लागते, असं म्हणत खा. राऊत यांनी शिवसेनेचं महत्त्व अधोरेकित केलं.

  नाव न घेता आशा बुचकेंवर टीका

  तसेच जुन्नर तालुक्यातचे देशात व राज्यात असणारे महत्व खा. राऊत यांनी सांगितले.  जिल्हा परिषद सदस्या आशा बुचके यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याबाबत खा. राऊत यांनी  त्यांचे नाव न घेता शिवसेना सोडून गेलेली बोचकी पुन्हा पक्षात घ्यायची नाहीत, अशा शब्दांत त्यांच्यावर निशाणा साधला.

  यावेळी शिवसेना उपनेते रविंद्र मिर्लेकर, शिवाजीराव आढळराव-पाटील, जिल्हाप्रमुख शरद सोनवणे, तालुकाप्रमुख माऊली खंडागळे, संपर्कप्रमुख दीपमाला बढे, नगराध्यक्ष शाम पांडे,  संभाजी तांबे, नेताजी डोके, शरद चौधरी, गुलाबराव पारखे, दिलीप डुंबरे, दीपेश परदेशी, दिलीप बामणे, प्रसन्ना डोके, बाळासाहेब पाटे, योगेश पाटे, चंद्रकांत डोके, आनंद रासकर, मंगेश काकडे  उपस्थित आहेत.

  भाजप, मनसे, राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत प्रवेश

  या मेळाव्यात भाजपचे नेते सुनिल मेहेर, भाजपच्या महिला आघाडीच्या माजी तालुकाध्यक्ष स्वाती ढोले, दत्तोबा ढोले, मनसेचे तालुका अध्यक्ष दत्ता शिंदे, तसेच इतर भाजप, राष्ट्रवादीच्या असंख्य कार्यकर्त्यांचा शिवसेनेचे खासदार संजय राऊत व उपनेते मिर्लेकर यांच्या उपस्थित शिवसेनेत प्रवेश केला.