राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार व आमदार रोहित पवारांबाबत आक्षेपार्ह ट्विट केल्याप्रकरणी भाजपा युवा मोर्चाचे प्रदेश सचिव प्रदीप गावडेला अटक

प्रदीप गावडे यांना आज मुंबई पोलिसांनी बेकायदेशीर पद्धतीने अटक केली. पुण्याहून त्यांना मुंबई पोलीस मुंबईत घेऊन आले. मुंबई पोलीस सत्ताधाऱ्यांच्या हातच खेळणे झाल आहे.सरकारवर टीका करण गुन्हा असेल तर तो आम्ही हजार वेळेस करू. प्रदीपच्या केसाला जरी धक्का लागला तर जबाबदारी आपली असेल - भाजपा आमदार राम सातपुते

    पुणे:भाजप आणि महाविकास आघाडी सरकारमध्ये सातत्याने आरोप – प्रत्यारोपाचे सत्र सुरूच असते. यामध्येकेवळ नेतेच नव्हे तर कार्यकर्तेही मागे नसल्याचे दिसून येते. नुकतेच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि आमदार रोहित पवार यांच्याबाबत आक्षेपार्ह ट्विट केल्याचा आरोप करत भाजपा युवा मोर्चाचे प्रदेश सचिव प्रदीप गावडे यांना मुंबई पोलिसांनी आज पुण्यातील त्यांच्या घरून ताब्यात घेतले आहे.

    राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वांद्रे येथील तालुका अध्यक्ष असलेले सागर जावळे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश सचिव संतोष धुवाळी यांच्यासोबत काम करत असून धुवाळी यांनी दिलेल्या माहितीवरून जावळे यांनी तक्रार देऊन मुंबई पोलिसांकडे प्रदीप गावडे यांच्याविरोधात जबाब दाखल केला आहे. मुस्लिम समाज, शरद पवार आणि रोहित पवार यांच्याविरोधात प्रदिप गावडे यांनी ट्विटर हँडलवर केलेल्या आक्षेपार्ह ट्विटबाबत १३ मेला जबाब जावळे यांनी दाखल केला. त्यावरूनच चौकशीसाठी गावडे यांना पुण्याहून मुंबईत चौकशीसाठी आणले आहे. मात्र, कोणताही एफआयआर किंवा ४१ अ ची नोटीस दिली असता असे चौकशीसाठी घेऊन जाणे बेकायदेशीर असल्याचे गावडे यांचे वकील संकेत देशपांडे यांनी सांगितले आहे.


    याबरोबरच भाजपा आमदार राम सातपुते यांनी ‘प्रदीप गावडे यांना आज मुंबई पोलिसांनी बेकायदेशीर पद्धतीने अटक केली. पुण्याहून त्यांना मुंबई पोलीस मुंबईत घेऊन आले. मुंबई पोलीस सत्ताधाऱ्यांच्या हातच खेळणे झाल आहे.सरकारवर टीका करण गुन्हा असेल तर तो आम्ही हजार वेळेस करू. प्रदीपच्या केसाला जरी धक्का लागला तर जबाबदारी आपली असेल’ , असे ट्वीट केले आहे.

    भाजप युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील यांनी याबाबत बोलताना सांगितले की, पंढरपूर निवडणुकीदरम्यान रोहीत पवारांच्या प्रचारासंदर्भात काही ट्वीट केले होते. त्याविरोधात पुणे आणि मुंबईत गुन्हे दाखल झाले होते. त्यानंतर त्याला एफआयआरची कॉपी न देता बीकेसी सायबर पोलिसांनी अटक केली आहे. तीन वर्षांपेक्षा कमी शिक्षा असलेल्या गुन्ह्यांत अटक करता येत नाही, असे सुप्रीम कोर्टाचे जजमेंट असुनही अटक झाली आहे.