श्रीक्षेत्र भिमाशंकर येथे मंदिरे आणि प्रार्थना स्थळे उघडण्याच्या मागणीसाठी भाजपाचे घंटानाद आंदोलन

भिमाशंकर : देशातील बहुतांश राज्यांनी धार्मिक स्थळे चालू केली परंतू महाराष्ट्र राज्यातील धार्मिक स्थळे राज्यसरकार ने खुली केली नाहित. या निमित्ताने श्री क्षेत्र भिमाशंकर मंदिरासमोर राज्यातील सर्व धार्मिक प्रार्थनास्थळे उघडण्याच्या मागणीसाठी वारकरी संप्रदाय व भाजपच्या वतीने आंबेगाव तालुकाध्यक्ष ताराचंद कराळे यांच्या नेतृत्वाखाली घंटानाद आंदोलन करण्यात आले.

कोरोनामुळे पार्श्वभूमीवर मागील पाच महिन्यापासून प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून बंद असलेली विविध मंदिरे, प्रार्थनास्थळे उघडावित या प्रमुख मागणीसाठी दि. २९ रोजी श्री क्षेत्र भिमाशंकर येथे आंबेगाव तालुका भाजपच्या वतीने घंटानाद आंदोलन करण्यात आले.

यावेळी पुणे जिल्हा भाजपा संपर्कप्रमूख जयसिंग एरंडे व जिल्हा भाजपाचे उपाध्यक्ष विजय पवार , भाजपा जिल्हाअध्यक्ष अनुसूचित जमाती मधुकर काठे , भाजपा सरचिटणीस आंबेगाव संदीप बाणखेले , सरचिटणीस अशोक गभाले, भाजपा युवा जिल्हा उपाध्यक्ष राजेश काळे, भाजपा युवा अध्यक्ष आंबेगाव हेमंत चिखले, भाजपा युवा नेते निलेश साबळे अनुसूचित जमाती आंबेगाव तालुका अध्यक्ष रमेश शेळके, भाजपा युवा नेते मंगेश गाडे ,भाजपा ओ बी सी आघाडी आंबेगाव अध्यक्ष सुरेश अभंग , युवा सरचिटणीस विकास बाणखेले, सोशल मिडिया सेलचे प्रसाद खोल्लंम विकास एरंडे व आंबेगाव तालुका भाजपाचे पदाधिकारी उपस्थित होते.