Black money

या कायद्याअंतर्गत सर्व शाळांमधील २५ टक्के जागा राखून ठेवण्यात येतात आणि तिथं समाजातील वंचित, दुर्बल घटकातील मुलांना प्रवेश दिला जातो. याच कायद्याअंतर्गत एका दुर्बल गटातील मुलीला प्रथितयश शाळेत प्रवेश मिळाला होता. मात्र प्रवेश निश्चितीसाठी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी पुणे महानगरपालिकेच्याअधिकाऱ्यानं मुलीच्या आईकडे तब्बल ५० हजार रुपयांची लाच  मागितली.

    पुणे :  सर्व खासगी शाळांमध्ये दुर्बल घटकांतील मुलांना शिक्षण अधिकाराखाली(Right to Education) प्रवेश दिला जातो. या कायद्याअंतर्गत सर्व शाळांमधील २५ टक्के जागा राखून ठेवण्यात येतात आणि तिथं समाजातील वंचित, दुर्बल घटकातील मुलांना प्रवेश दिला जातो. याच कायद्याअंतर्गत एका दुर्बल गटातील मुलीला प्रथितयश शाळेत प्रवेश मिळाला होता. मात्र प्रवेश निश्चितीसाठी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी पुणे महानगरपालिकेच्याअधिकाऱ्यानं मुलीच्या आईकडे तब्बल ५० हजार रुपयांची लाच  मागितली.

    या महिलेनं लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिल्यानं या लाचखोर अधिकाऱ्याला सापळा रचून लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं रंगेहाथ (Red Handed) पकडलं आहे. शिवाजी बबन बोखरे असं या अधिकाऱ्याचं नाव असून, तो पुणे महानगरपालिकेच्या शिक्षण विभागात(Education Department) सहाय्यक प्रशासकीय अधिकारी(Assistant Administrative Officer) म्हणून कार्यरत आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, ५० वर्षीय बोखरे यानी या मुलीच्या आईकडे शालेय प्रवेशासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे देण्यासाठी ५० हजार रुपयांची लाच मागितली होती. शिक्षण अधिकाराखाली (RTE) या मुलीला एका प्रथितयश शाळेत प्रवेश मिळाला होता. शाळेत आरटीई अंतर्गत प्रवेश देण्यात आलेल्या मुलांच्या यादीत या मुलीचं नाव होतं.

    त्याकरता आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी महापालिकेच्या शिक्षण विभागाकडं त्या मुलीच्या आईनं संपर्क साधला होता. त्यावेळी बोखरे यानं ५० हजार रुपये दिल्यास कागदपत्रे देण्याची अट घातली होती. त्यावर या मुलीच्या आईनं लाचलुचपत प्रतिबंधक खात्याकडे तक्रार नोंदवली. त्याची दखल घेत, लाच स्वीकारताना बोखरे याला रंगेहाथ पकडण्यात आलं आहे.