नात्याला काळिमा! दिरानेच केला भावजयीवर बलात्कार ; पुण्यातील धक्कादायक घटना

फिर्यादी यांचे त्यांच्या पतीबरोबर वाद झाले. त्यातून त्या कासेवाडी येथे आपल्या आईकडे राहायला आल्या होत्या. १२ फेब्रुवारी रोजी दुपारी त्यांचा दीर त्यांच्या आईकडे आला. त्याने सासरी घेऊन जाण्यासाठी आलो असे खोटे सांगितले. त्यावर त्यांनी त्याला घरात घेतले. तेव्हा दिराने त्यांचे तोंड दाबून, ‘काय बोलायचे नाही. आरडाओरडा केला तर तुला जिवे मारून टाकीन’ अशी धमकी देऊन त्यांच्यावर बलात्कार केला.

    पुणे : पतीबरोबर वाद झाल्याने माहेरी गेलेल्या भावजयीला सासरी आणण्यासाठी आलो असल्याचा बहाणा करून दिराने बलात्कार केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी रामटेकडी येथे राहणाऱ्या २४ वर्षांच्या विवाहितेने खडक पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. पोलिसांनी फिर्यादीच्या २६ वर्षांच्या दिरावर गुन्हा दाखल करून अटक केली आहे. ही घटना कासेवाडी येथे १२ फेब्रुवारी रोजी दुपारी घडली होती.

    फिर्यादी यांचे त्यांच्या पतीबरोबर वाद झाले. त्यातून त्या कासेवाडी येथे आपल्या आईकडे राहायला आल्या होत्या. १२ फेब्रुवारी रोजी दुपारी त्यांचा दीर त्यांच्या आईकडे आला. त्याने सासरी घेऊन जाण्यासाठी आलो असे खोटे सांगितले. त्यावर त्यांनी त्याला घरात घेतले. तेव्हा दिराने त्यांचे तोंड दाबून, ‘काय बोलायचे नाही. आरडाओरडा केला तर तुला जिवे मारून टाकीन’ अशी धमकी देऊन त्यांच्यावर बलात्कार केला. आपल्या घरात कोणाला सांगायचे नाही. सांगितले तर तुझी इज्जत जाईल, असे म्हणून फिर्यादी व तिच्या आईला जिवे मारून टाकेन अशी धमकी दिली.