शिक्रापुरात कोरोनाग्रस्तांसाठी रक्तदान शिबीर

कर्जत : युवक काँग्रेसच्यावतीने कोरोना रूग्णांना रक्ताची कमतरता भासू नये म्हणून राज्य पातळीवर मोठ्या प्रमाणात रक्तदान युवकांनी करावे म्हणून आवाहन करण्यात आले होते. या आवाहनाला कर्जत जामखेड

 कर्जत : युवक काँग्रेसच्यावतीने कोरोना रूग्णांना रक्ताची कमतरता भासू नये म्हणून राज्य पातळीवर मोठ्या प्रमाणात रक्तदान युवकांनी करावे म्हणून आवाहन करण्यात आले होते. या आवाहनाला कर्जत जामखेड  विधानसभा अध्यक्ष व नगरसेवक सचिन घुले यांनी प्रतिसाद देत कर्जत येथे भव्य रक्तदान शिबीर घेऊन १२० बाटल्या जमा करून शासनाकडे सुपुर्द केल्या आहेत. 

महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात व युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत नगरसेवक सचिन घुले यांच्या पुढाकारातून कर्जत पाटील गल्ली येथील श्री संत गोदड महाराजांच्या ध्यान मंदीरात भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी   कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब साळुंके, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रवीण घुले व कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष किरण पाटील आदी उपस्थित होते.

यावेळी बोलताना युवक काँग्रेसचे अध्यक्ष सचिन घुले म्हणाले , कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात रक्ताचा तुटवडा निर्माण झाला असून मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात व प्रदेश युवक अध्यक्ष सत्यजित तांबे यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत आम्ही हा उपक्रम राबविला असुन आज १२० बाटल्या रक्तदान करण्यात आले आहे .

यावेळी घुले म्हणाले की सर्व रक्तदात्यांना रक्तदान केल्या नंतर प्रत्येकाला मास्क, सॅनिटायजर व कोरोना प्रतिबंधक अर्सेनिक अल्बम ३० या होमिओपॅथी औषधाचे वाटप करण्यात आले आहे.या कार्यक्रमास कॉंग्रेसच जिल्हाध्यक्ष बाळासाहेब साळुंके, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रवीण घुले, तालुकाध्यक्ष किरण पाटील, तात्यासाहेब ढेरे, नगरसेवक संतोष मेहेत्रे, संदिप बरबडे, ओंकार तोटे, तसेच राजमाता जिजाऊ ग्रामविकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष महेश तनपुरे, अभिनव युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष धनंजय लाढाने, , संभाजी पाटील, भाऊसाहेब तोरडमल, भास्कर भैलुमे, माजीद पठाण, बिलाल पठाण, अमोल भगत इत्यादी मान्यवर उपस्थित होते.