Excitement over the discovery of unidentified bodies under the Raita river bridge sj

सोमवारी खराडी भागातील आयटी पार्कजवळ असलेल्या एका खाणीत तरुण मृतावस्थेत असल्याची माहिती चंदननगर पोलिसांना मिळाली. पोलिसांनी अग्निशमन दलाच्या मदतीने हा मृतदेह पाण्यातून बाहेर काढला. चौकशी सुरू असताना तो मृतदेह शेख याचा असल्याचे उघडकीस आले. त्यानंतर पुणे पोलिसांनी ही माहिती हैद्राबाद पोलिसांना दिली आहे. शेखने आत्महत्या केल्याचा संशय पोलिस व्यक्त करत आहेत. पण, यामुळे हैद्राबाद पोलीस वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. 

    पुणे : अपहरणाच्या गुन्ह्यात हैद्राबाद पोलिसांच्या तावडीतून पसार झालेल्या आरोपीचा मृतदेह सोमवारी दुपारी चंदननगर येथील खराडी आयटी पार्क भागात खाणीत सापडला आहे. त्याने आत्महत्या केल्याचा संशय आहे.जुबेर हाफिज शेख (वय २०) असे मृतावस्थेत सापडलेल्याचे नाव आहे.

    शेख हा बिदर जिल्ह्यातील मरकुंडा गावचा होता. अल्पवयीन मुलीचे अपहरण केल्याप्रकरणी त्याच्यावर हैद्राबाद येथील सरूरनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता. तो चंदननगर भागात त्याच्या नातेवाईक यांच्याकडे राहत असल्याची माहिती हैद्राबाद पोलिसांना मिळाली होती. त्यासाठी हे पथक पुण्यात त्याला पकडण्यासाठी आले होते. त्याला २० ऑगस्ट रोजी हैद्राबाद पोलीस दलातील उपनिरीक्षक बी. कृष्णय्या रामलू व त्यांच्या पथकाने चंदननगर भागातून ताब्यात घेतले. त्याच्यासोबत अपहरण झालेली मुलगी देखील होती. या दोघांना घेऊन हे पथक परत निघाले होते.
    खरडी भागात एका हॉटेलजवळ पोलिस थांबवले होते. त्यावेळी तो बहिणीला बोलत असताना पोलिसांच्या ताब्यातून पसार झाला होता. याप्रकरणी चंदननगर पोलिस ठाण्यात हैद्राबाद पोलिसांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला होता. त्याचा शोध हैद्राबाद पोलीस व चंदननगर पोलीस घेत होते.

    दरम्यान, सोमवारी खराडी भागातील आयटी पार्कजवळ असलेल्या एका खाणीत तरुण मृतावस्थेत असल्याची माहिती चंदननगर पोलिसांना मिळाली. पोलिसांनी अग्निशमन दलाच्या मदतीने हा मृतदेह पाण्यातून बाहेर काढला. चौकशी सुरू असताना तो मृतदेह शेख याचा असल्याचे उघडकीस आले. त्यानंतर पुणे पोलिसांनी ही माहिती हैद्राबाद पोलिसांना दिली आहे. शेखने आत्महत्या केल्याचा संशय पोलिस व्यक्त करत आहेत. पण, यामुळे हैद्राबाद पोलीस वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत.