नारायण राणे यांच्यावर गुन्हा दाखल करा ; पिंपरी चिंचवड युवा सेनेची मागणी

युवा सेनेचे उपशहर अधिकारी राजेंद्र तरस यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने आज पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. युवा सेनेने केंद्रीय मंत्री राणे यांचा निषेध केला आहे. मुखमंत्री ठाकरे यांच्यावरील राणे यांच्या खालच्या पातळीवरील टीकेने राज्यभरात शिवसेना पदाधिकाऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

    पिंपरी : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी रायगड येथील पत्रकार परिषदेत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर खालच्या पातळीची टीका केली आहे. त्यामुळे राणे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी पिंपरी चिंचवड शहर युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे.

    यासंदर्भात युवा सेनेचे उपशहर अधिकारी राजेंद्र तरस यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने आज पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. युवा सेनेने केंद्रीय मंत्री राणे यांचा निषेध केला आहे. मुखमंत्री ठाकरे यांच्यावरील राणे यांच्या खालच्या पातळीवरील टीकेने राज्यभरात शिवसेना पदाधिकाऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. तसेच अशांतता व गोंधळ निर्माण झाला आहे. त्यामुळे केंद्रीय मंत्री राणे यांच्यावर तत्काळ गुन्हा दाखल करण्याची मागणी युवा सेनेने केली आहे.

    युवा सेनेचे शहर अधिकारी विश्वजित बारणे, उपशहर अधिकारी राजेंद्र तरस, शहर समन्वयक रूपेश कदम, विधानसभा अधिकारी निलेश हाके, माऊली जगताप, युवती अधिकारी प्रतीक्षा घुले आदींच्या निवेदनावर स्वाक्षऱ्या आहेत.