तळेगाव ढमढेरे येथे दोघांना कोरोनाची लागण

शिक्रापूर : तळेगाव ढमढेरे ता. शिरूर येथील एका ६० वर्षीय महिलेचा कोरोनाने मृत्यू झाल्यानंतर या महिलेच्या कुटुंबातील आणखी दोघांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती शिरुर तालुका वैद्यकीय

शिक्रापूर :  तळेगाव ढमढेरे ता. शिरूर येथील एका ६० वर्षीय महिलेचा कोरोनाने मृत्यू झाल्यानंतर या महिलेच्या कुटुंबातील आणखी दोघांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती शिरुर तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेंद्र शिंदे व तळेगाव ढमढेरे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रज्ञा घोरपडे यांनी दिली आहे.

तळेगाव ढमढेरे ता. शिरूर येथील कोरोना बाधित मृत महिलेच्या कुटुंबातील दोघांना देखील कोरोनाची लागण झाली असून त्यांचे वय ४७ व ४२ वर्षे आहे. त्यांचा तळेगाव ढमढेरे परिसरात भाजीपाला व्यवसाय करीत असल्याने भाजीपाला व्यवसायाच्या निमित्ताने पुण्याला ये जा सुरू होती. तळेगाव ढमढेरे ता. शिरूर येथील ६० वर्षीय महिला कोरोना बाधित आढळल्यानंतर या महिलेच्या कुटुंबामधील संपर्कातील चार जणांचे स्वँब नमुने कोरोना चाचणीसाठी पाठविण्यात आले होते त्यातील दोघांचे अहवाल पॉझिटिव आले आहेत. तर कोरोना बाधित महिलेच्या संपर्कातील खाजगी रुग्णालयातील डॉक्टर, नर्स व इतर अशा वीस जणांचे स्वँबचे नमुने काल उशिरा पाठविण्यात आलेले आहेत.  त्याचे रिपोर्ट आज उशिरापर्यंत मिळतील , असे  वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रज्ञा घोरपडे यांनी सांगितले. तर सध्या या वीस जणांना कोरंटाईन करण्यात आले असून शिक्रापूर व तळेगाव ढमढेरे परिसरात अधून मधून सातत्याने कोरोनाबाधित रुग्ण आढळून येत असून आतापर्यंत परिसरातील कोरोना बाधितांची संख्या आठ झाल्याने परिसरात खळबळ उडाली असून भीतीचे वातावरणही निर्माण झाले आहे. शिरूर तालुक्यातील प्रशासकीय अधिकाऱ्यांनी व आरोग्य अधिकाऱ्यांनी येथे धाव घेत परिसरात ग्रामपंचायतीच्या वतीने फवारणी सुरु केली आहे. कोरोना बधितांच्या संपर्कात आलेल्या सर्व व्यक्तींची माहिती काढण्याचे काम प्रशासनाकडून युद्धपातळीवर हाती घेण्यात आले असून कोरोना बाधित महिलेच्या तसेच कोरणा बाधित दोन  युवकांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींची माहिती घेण्याचे काम सुरु आहे. यावेळी प्रशासनाकडून तळेगाव ढमढेरे परिसर पूर्णपणे बंद करण्यात आला असून सर्व रस्ते बंद केले आहेत. तसेच  गावात निर्जंतुक औषध फवारणी करण्यात आलेली आहे. पुढील काही काळ देखील येथे आरोग्य अधिकाऱ्यांच्या वतीने वेगवेगळ्या तपासण्या करण्यात येणार आहेत.

"तळेगाव ढमढेरे येथील कोरोणा बाधित महिलेच्या कुटुंबातील दोघांचा कोरोना अहवाल पॉझिटिव आला आहे. तर बाधितांच्या संपर्कातील अन्य व्यक्तींची माहिती घेण्याचे काम सुरू असून  संपर्कातील अशा सर्वांना क्वारनटाईन करणार ." 

-डॉ. राजेंद्र शिंदे , वैद्यकीय अधिकारी , शिरूर

"तळेगाव ढमढेरे हे गाव रेड झोन मध्ये गेल्याने नागरिकांनी विनाकारण घराच्या बाहेर पडू नये प्राथमिक आरोग्य केंद्राच्या माध्यमातून आरोग्य कर्मचारी आशा स्वयंसेविका व शिक्षक सध्या सर्वेक्षणाचे काम करीत आहेत हे कर्मचारी सर्वेक्षणाला घरी आल्यानंतर बाहेरून आलेल्या व्यक्तीची माहिती लपवू नये " 

 -डॉ. प्रज्ञा घोरपडे, प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी ,तळेगाव ढमढेरे