घरात घुसून दीड लाखाची चोरी; थेरगावातील घटना

    पिंपरी : उघड्या दरवाजाद्वारे घरात घुसून चोरट्यांनी घरातील सोन्याचे दागिने आणि रोकड असा १ लाख ६७ हजारांचा ऐवज चोरून नेला. तसेच बेडरूममधील गादी जाळून नुकसान केले. ही घटना पाटीलनगर-थेरगाव येथे गुरुकुंज सोसायटीमध्ये उघडकीस आली.

    विवेक अरुणकुमार इंदोरिया (वय ३४, रा. गुरुकुंज सोसायटी, दगडू पाटीलनगर, थेरगाव) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. १४ ते २७ जून या कालावधीत चोरट्याने विवेक यांच्या घराच्या उघड्या दरवाजातून आत शिरून १ लाख ८ हजार रुपये किमतीच्या सोन्याच्या दोन बांगड्या, ५४ हजार रुपये किमतीचे मणी मंगळसूत्र आणि पाच हजार रुपयांची रोकड असा १ लाख ६७ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. तसेच विवेक यांच्या बेडरूममधील गादी जाळून नुकसान केले. वाकड पोलीस तपास करत आहेत.