बारामतीत चोरांचा सुळसुळाट, आधी दुकानं फोडली नंतर आइस्क्रीम खावून.., व्हिडिओ व्हायरल

बारामतीतील (Baramati) मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या शिवाजी चौकातील सुख शांती अपार्टमेंटयेथील पाच दुकाने (Five Shops) अज्ञात चोरट्यांनी फोडली. त्यानंतर चोरट्यांनी रोख रक्कम लंपास केली आहे.

बारामती : बारामतीमध्ये (Baramati) चोरट्यांनी एकाच रात्री एकापाठोपाठ दुकानं फोडल्याची घटना समोर आली आहे. दुकानातील रोख रक्कम लंपास करून चोरांनी आइस्क्रीम (Ice-Cream) फस्त केली आहे. हा सर्व प्रकार सीसीटीव्ही (CCTV Camera) कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

बारामतीतील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या शिवाजी चौकातील सुख शांती अपार्टमेंटयेथील पाच दुकाने अज्ञात चोरट्यांनी फोडली. त्यानंतर चोरट्यांनी रोख रक्कम लंपास केली आहे. शहरातील शिवाजी चौकातील गजबजलेल्या ठिकाणी असलेल्या या अपार्टमेंटमधील शिवशक्ती इंटरप्राईजेस, इलेक्ट्रॉनिक्स या दुकानातील रोख चोरट्यांनी चोरून नेली आहे.

तसंच कलर पेंट, चप्पल शूज, डिझाईनिंग आणि आइस्क्रीम पार्लर असे पाच दुकाने क्रमाने फोडून या दुकानातील रोख रक्कम चोरट्यांनी लंपास केले आहे. दरम्यान, सकाळी हे दुकाने फोडल्याचे निदर्शनास आल्यानंतर दुकान मालकांनी घटनेची माहिती बारामती शहर पोलिसांना दिली. या प्रकरणी अज्ञात चोरांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.