बीआरटी मार्गावर पदपथ, सायकल ट्रॅक करणार ; साडेअकरा कोटी खर्च होणार

चिंचवड येथील केएसबी चौक ते स्पाईन रस्त्यापर्यंतच्या बीआरटी मार्गावरील पदपथ आणि सायकल ट्रॅक अत्याधुनिक पद्धतीने विकसित करण्यात येणार आहे. या कामासाठी महापालिकेतर्पेâ ठेकेदारांकडून निविदा मागविण्यात आल्या. त्यासाठी १२ कोटी ३२ लाख १८ हजार रूपये खर्च अपेक्षित धरण्यात आला.

    पिंपरी: पिंपरी – चिंचवड महापालिकेच्यावतीने चिंचवड येथील केएसबी चौक ते स्पाईन रस्त्यापर्यंतच्या बीआरटी मार्गावरील पदपथ आणि सायकल ट्रॅक अत्याधुनिक पद्धतीने विकसित करण्यात येणार आहे. या कामासाठी साडेअकरा कोटी रूपये खर्च होणार आहेत. चिंचवड येथील केएसबी चौक ते स्पाईन रस्त्यापर्यंतच्या बीआरटी मार्गावरील पदपथ आणि सायकल ट्रॅक अत्याधुनिक पद्धतीने विकसित करण्यात येणार आहे. या कामासाठी महापालिकेतर्पेâ ठेकेदारांकडून निविदा मागविण्यात आल्या. त्यासाठी १२ कोटी ३२ लाख १८ हजार रूपये खर्च अपेक्षित धरण्यात आला. त्यामध्ये रॉयल्टी व मटेरियल टेस्टींग शुल्क वगळून १२ कोटी २६ लाख रूपये दर ठरवून निविदा मागविण्यात आल्या. त्यानुसार, चार ठेकेदारांनी निविदा सादर केल्या. त्यापैकी एच. सी. कटारीया या ठेकेदाराने निविदा दरापेक्षा ६.६० टक्के कमी दराने निविदा सादर केली. म्हणजेच ११ कोटी ४५ लाख ११ हजार रूपये अधिक रॉयल्टी चार्जेस ४ लाख ८४ हजार आणि मटेरीयल टेस्टींग चार्जेसपोटी ६ लाख १४ हजार रूपये असे एकूण ११ कोटी ५६ लाख ११ हजार रूपये खर्च होणार आहे. महापालिका आयुक्त राजेश पाटील यांनी या कामांची निविदा स्विकारण्यास २६ फेब्रुवारी रोजी मान्यता दिली आहे. दीड वर्षात या हे काम पूर्ण करण्यात येणार आहे.