Satara bullock cart race organized; 30 charged

बैलगाडा शर्यतीवर महाराष्ट्रात बंदी असताना शर्यतीचे आयोजन केल्याप्रकरणी मावळमधील 21 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बैलगाडा शर्यतीचे आयोजन मावळमधील शिवणे येथे करण्यात आले होते. कोरोना संकटातून देश जात असताना आणि बैलगाडा शर्यतीवर बंदी असून ही बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे.

    पुणे : बैलगाडा शर्यतीवर महाराष्ट्रात बंदी असताना शर्यतीचे आयोजन केल्याप्रकरणी मावळमधील 21 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बैलगाडा शर्यतीचे आयोजन मावळमधील शिवणे येथे करण्यात आले होते. कोरोना संकटातून देश जात असताना आणि बैलगाडा शर्यतीवर बंदी असून ही बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे.

    वडगाव मावळ पोलिसांत याप्रकरणी गाडा मालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गणेश दत्तात्रय म्हस्के, हनुमंत शिवाजी म्हस्के, विक्रम बाळासाहेब केडे, आदिनाथ बाळू गराडे, आदिनाथ बाळू म्हस्के, मनोज अंकुश ढोरे यांच्यासह 21 जणांवर गुन्ह दाखल करण्यात आला आहे.

    मावळमधील शिवणे येथे बैलगाडा घाटात बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते. कोरोना नियमांचे उल्लंघन करत शर्यत पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती.