तक्रारवाडीत भरदिवसा चार ठिकाणी घरफोड्या ; सव्वा दोन लाखाचा ऐवज लुटला

भिगवण : भिगवण जवळ तक्रारवाडी गावात सोमवारी (दि30)अज्ञात चोरट्यांनी भरदिवसा बारा वाजता १५ मिनिटात चार घरफोड्या करून जवळपास दोन लाखाचे सोने व रोख रक्कम १२ हजार रुपये चोरून नेली आहे. सोमवार दिनाक ३० रोजी भरदुपारी १२.२० ते १२.४० चे दरम्यान हि घटना घडली आहे.

भिगवण : भिगवण जवळ तक्रारवाडी गावात सोमवारी (दि30)अज्ञात चोरट्यांनी भरदिवसा बारा वाजता १५ मिनिटात चार घरफोड्या करून जवळपास दोन लाखाचे सोने व रोख रक्कम १२ हजार रुपये चोरून नेली आहे.
सोमवार दिनाक ३० रोजी भरदुपारी १२.२० ते १२.४० चे दरम्यान हि घटना घडली आहे. मोरे कुटूबीय हे शेजारी राहणार्‍या वाघ कुटुंबियांच्या मुलाच्या लग्नासाठी गावातील शाळेत गेले होते.लग्न १२.२४ वाजता असल्याने १२.२० वाजता मोरे कुटुंबातील शेवटचा माणूस घराला कडी लावून लग्नास गेला.लग्न वेळेवर लागल्याने ती व्यक्ती लगेच १५ मिनिटात घरी परत आली.आणि घरात गेल्या नंतर घरातील गोदरेज कपाड फोडलेले दिसले व त्यातील सामान अस्ताव्यस्त पडलेले दिसले. त्यावेळी त्यांना चोरी झाल्याचे कळाले. दरम्यान पुढील महिन्यात मुलीचे लग्न असल्याने मुलीच्या लग्नासाठी नुकतेच पै पै जमा करून सोन्याचे दागिने बनविले होते.त्यावरच या चोरट्यांनी डल्ला मारल्याने मोरे कुटुंबावर मोठा आघात झाला असून,या प्रकाराने गावात एकच खळबळ उडाली आहे.

याबाबत भिगवण पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, काल दुपारी तक्रारवाडी गावात बापूराव मोरे यांचे शेजारील राजेंद्र वाघ यांचे मुलाचे लग्नासाठी मोरे कुटुंबीय घराला कडी लावून गेले असता अज्ञात चोरट्यांनी पाळत ठेवून लग्न घराचे जवळील लोकांचे कडी लावलेले घरात घुसून घरातील सोने चांदीचे दागिने चोरून नेले आहेत.याची फिर्याद सागर बापूराव मोरे यांनी पोलीसात दिली असून आणखी त्यांचे चुलते बाळू मोरे आणि वाळके कुटुंबातील दोन घरात घुसून चोरट्यांनी त्यांच्या घरातील सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरून नेली आहे.यात फिर्यादीचा १,५०,८०० रुपयांचा सोने चांदीचा माल व रोख रक्कम ३००० रुपये तर बाळू मोरे यांचे घरातून ६०,००० रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम ५००० रुपये आणि वाळके यांचे घरातून रोख रक्कम ४००० रुपये चोरून नेले आहेत.या घटनेचा तपास भिगवण पोलीस करीत आहेत.