पिंपरीतील भीमनगरमध्ये घरफोडी

चांदण दिलीप थोरात (वय ३६, रा. युगांतर मित्र मंडळ चौक, भीमनगर, पिंपरी) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी थोरात यांचे घर २९ एप्रिल रोजी दुपारी दोन ते ३० एप्रिल रोजी दुपारी पाच वाजताच्या कालावधी कुलूप लावून बंद होते.

    पिंपरी :  पिंपरी भीमनगर येथे युगांतर मित्र मंडळ चौकात घरफोडी झाली. या घरफोडीमध्ये चोरट्यांनी घरातील सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम चोरून नेली. ही घटना ३० एप्रिल रोजी दुपारी उघडकीस आली.

    चांदण दिलीप थोरात (वय ३६, रा. युगांतर मित्र मंडळ चौक, भीमनगर, पिंपरी) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी थोरात यांचे घर २९ एप्रिल रोजी दुपारी दोन ते ३० एप्रिल रोजी दुपारी पाच वाजताच्या कालावधी कुलूप लावून बंद होते. दरम्यानच्या कालावधीत चोरट्यांनी घराच्या दरवाजातील खालची फळी तोडून घरात प्रवेश केला. घरातील लोखंडी कपाट उघडून त्यातून सोन्याची अंगठी आणि रोख रक्कम असा एकूण २७ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.