खराडीत घरफोडी, सव्वा लाखांचे दागिने लंपास

पुणे : बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी १ लाख ३७ हजारांचे दागिने चोरुन नेले. ही घटना खराडी बायपास परिसरातील श्रीपार्वती सोसायटीत घडली. याप्रकरणी अजय जोंधळे (वय ४२) यांनी विमानतळ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अजय कुटूंबियासह खराडी बायपास परिसरातील श्रीपार्वती सोसायटीत राहयला आहेत. कामानिमित्त ते कुटूंबियासह बाहेरगावी गेले होते. त्यावेळी चोरट्यांनी त्यांच्या घराचे कुलूप तोडून १ लाख ३७ हजारांचे दागिने चोरुन नेले. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक गिरी अधिक तपास करीत आहेत.