लग्नासाठी बाहेरगावी गेलेल्या घरात दोन लाखांची घरफोडी ; भोसरी येथील घटना

समर कामतेकर हे ग्वालेर येथे कुटुंबासह एका लग्नाला गेले होते. त्यांचे घर २३ ते २७ एप्रिल सकाळी या कालावधीत बंद होते. चोरट्यांनी त्यांच्या घराचा मुख्य दरवाज्याचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. घरातील चांदीचे मनगटी घड्याळ, लॅपटॉप, रोख रक्कम असा दोन लाख १८ हजारांचा ऐवज चोरून नेला. भोसरी पोलीस तपास करत आहेत.

    पिंपरी :  कुटुंबासह लग्नासाठी बाहेरगावी गेलेल्या पत्रकाराचे घर चोरट्यांनी फोडून घरातील २ लाख १८ हजारांचा किंमती ऐवज चोरून नेला. ही घटना भोसरीतील आपटे कॉलनी येथे घडली. समर सारंग कामतेकर (वय – २९, रा. भाग्यदर्शन सोसायटी, भोसरी) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, समर कामतेकर हे ग्वालेर येथे कुटुंबासह एका लग्नाला गेले होते. त्यांचे घर २३ ते २७ एप्रिल सकाळी या कालावधीत बंद होते. चोरट्यांनी त्यांच्या घराचा मुख्य दरवाज्याचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. घरातील चांदीचे मनगटी घड्याळ, लॅपटॉप, रोख रक्कम असा दोन लाख १८ हजारांचा ऐवज चोरून नेला. भोसरी पोलीस तपास करत आहेत.