भोसरीत पावणेतीन लाखाची घरफोडी

घराचा कडी-कोयंडा तोडून चोरट्यांनी आतील कपाटाचे लॉकर तोडले आणि १२ तोळे सोने, दिड किलो चांदी, रोकड असा २ लाख ८१ हजार रूपयांचा ऐवज चोरून नेला. भोसरी एमआयडीसी पोलीस तपास करत आहेत.

    पिंपरी : दरवाजाचे कुलूप तोडून चोरट्यांनी कपाटाच्या लॉकरमधील १२ तोळे सोने, दिड किलो चांदी असा तब्बल पावणेतीन लाखांचा ऐवज चोरून नेला. ही घटना भोसरी – इंद्रायणीनगर येथे घडली.

    डॉ. सुप्रिया विलास कुलकर्णी (वय ६६, रा. समर्थ कॉलनी, इंद्रायणीनगर, भोसरी) यांनी भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी कुलकर्णी यांचे घर २१ ते २६ मे या कालावधीत कुलूप लावून बंद होते. घराचा कडी-कोयंडा तोडून चोरट्यांनी आतील कपाटाचे लॉकर तोडले आणि १२ तोळे सोने, दिड किलो चांदी, रोकड असा २ लाख ८१ हजार रूपयांचा ऐवज चोरून नेला. भोसरी एमआयडीसी पोलीस तपास करत आहेत.