शॉर्टसर्किटमुळे दीड एकर ऊस जळून खाक

सुमारे एक लाख रुपयांहुन अधिक नुकसान मंचर : आंबेगाव तालुक्यातील अवसरी खुर्द -कौलीमळा येथे विजवाहक तार तुटून झालेल्या शॉर्टसर्किटमूळे शेतकरी संतोष पांडुरंग भोर यांचा सुमारे दीड एकर ऊस

सुमारे एक लाख रुपयांहुन अधिक नुकसान  
मंचर :
आंबेगाव तालुक्यातील अवसरी खुर्द -कौलीमळा येथे विजवाहक तार तुटून झालेल्या शॉर्टसर्किटमूळे शेतकरी संतोष पांडुरंग भोर यांचा सुमारे दीड एकर ऊस जळाला. सुमारे एक लाख रुपयांहुन अधिक नुकसान झाले आहे. ही घटना रविवार दि.१७ रोजी सायंकाळी पाच वाजता घडली. अवसरी फाट्या जवळील कौलीमळा येथे शेतकरी संतोष पांडुरंग भोर यांनी सुमारे तीन एकर क्षेत्रात उसाची लागवड केली होती. उसाच्या पिकावरुन गेलेल्या विजवाहक तारापैकी एक तार तुटून तीन एकर क्षेत्रापैकी दिड एकर क्षेत्रातील ऊस आगीत जळुन खाक झाला. वीज पुरवठा बंद केल्याने विहिरीवरील पंप चालू करुन आग विझवता आली नाही. वीज वितरण कंपनीकडे वेळोवेळी मागणी करुनही वीजवाहक तारांना पडलेले घोळ अद्याप दुरुस्त न केल्याने शॉर्टसर्किटचे प्रकार वारंवार घडत आहे.