सासवडमध्ये पेट्रोल चोरी करणाऱ्या आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश ; पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल याची माहिती

या गुन्ह्याबाबत अधिक माहिती अशी की, २३ फेब्रुवारी रोजी दुपारी ३.४० वाजण्याच्या सुमारास मौजे सासवड ता. फलटण गावच्या हद्दीतुन शेतजमीनीच्या खालुन जाणारी एच. पी. कंपनीच्या पेट्रोल पाईप लाईनला होल पाडुन पेट्रोलची चोरी करण्याचा प्रयत्न अज्ञातांनी केला होता. हा प्रयत्न करत असताना पाईपलाईन मधुन सुमारे २ हजार लिटर पेट्रोल शेजारच्या ज्वारीच्या शेतात पसरल्याने ते जमिनीत मुरले व आजुबाजूच्या विहीरीत उतरुन शेतकऱ्याचे नुकसान झाले होते.

    सातारा : सासवड ता. फलटण गावच्या हद्दीत शेतजमिनी खालून जाणाऱ्या एच.पी. कंपनीच्या पेट्रोल पाईप लाईनला होल पाडून लाखो रुपयांचे पेट्रोल चोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या शेतमालकासह सराईत अंतरराज्य टोळीतील सात संशयित आरोपींना पिंपरी – चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या मदतीने पिंपरी चिंचवड परिसरात शिफातीने सापळा रचून लोणंद पोलिसानी जेरबंद केले आहे. त्यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना ३ दिवसाची पोलीस कोठडी दिली आहे, अशी माहिती जिल्हा पोलीस प्रमुख अजयकुमार बंसल यांनी लोणंद येथे पत्रकार परिषदेमध्ये दिली.

    या गुन्ह्याबाबत अधिक माहिती अशी की, २३ फेब्रुवारी रोजी दुपारी ३.४० वाजण्याच्या सुमारास मौजे सासवड ता. फलटण गावच्या हद्दीतुन शेतजमीनीच्या खालुन जाणारी एच. पी. कंपनीच्या पेट्रोल पाईप लाईनला होल पाडुन पेट्रोलची चोरी करण्याचा प्रयत्न अज्ञातांनी केला होता. हा प्रयत्न करत असताना पाईपलाईन मधुन सुमारे २ हजार लिटर पेट्रोल शेजारच्या ज्वारीच्या शेतात पसरल्याने ते जमिनीत मुरले व आजुबाजूच्या विहीरीत उतरुन शेतकऱ्याचे नुकसान झाले होते. यावेळी नुकसान झालेल्या पेट्रोलचे मुल्य बाजारभावनुसार १ लाख ९० हजार रुपये असल्याचे हिंदुस्थान पेट्रोलियम कार्पोरेशन लिमीटेड या कंपनीचे सहाय्यक प्रबंधक विकी सत्यवान पिसे यांनी लोणंद पोलीस स्टेशनला दिलेल्या तक्रारीत म्हटले होते, या घटनेचे गांभिर्य लक्षात घेवुन जिल्हा पोलीस प्रमुख अजयकुमार बंसल, अपर पोलीस अधीक्षक धीरज पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी तानाजी बरडे यांनी सदर गुन्ह्याचा छडा लावण्याबाबत लोणंदचे सपोनि विशाल वायकर यांना सुचना केल्या होत्या.

    यानंतर सपोनि विशाल वायकर यांनी तांत्रिक माहितीच्या आधारे गुन्हे प्रकटीकरण पथकासोबत या गुन्ह्याच्या मुळाशी जात पेट्रोल चोरीचा प्रयत्न केल्याप्रकरणी शेतजमीन मालकासह सराईत अंतरराज्य टोळीतील ७ संशयित आरोपीना पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या मदतीने पिंपरी चिंचवड परिसरातुन ताब्यात घेतले आहे. इंट्रॉगेशन स्किलचा वापर करत सपोनि वायकर यांनी केलेल्या तपासात अनिल हरीशंकर पाठक, वय ३२ रा. मुळ पिंडराई पटखान जि. वाराणसी, उत्तरप्रदेश सध्या रा. वाल्हेकरवाडी चिंचवड, बाळु आण्णा चौगुले वय ४२ रा. रामनगर, पिपंरी चिंचवड, मोतीराम शंकर पवार वय २० रा. गवळीमाथा भोसरी पुणे, इस्माईल पिरमहंमद शेख वय ६२ वर्षे रा. डीमार्ट शेजारी पिपंरी चिचंवड, शाम शिवाजी कानडी वय ५० रा. वाल्हेकरवाडी पिंपरी चिंचवड, दत्तात्रय सोपान लोखंडे वय ४१ रा. सासवड ता. फलटण, नामदेव ज्ञानदेव जाधव वय २८ वर्षे रा. दालवडी ता. फलटण या सातही जणांनी सदरचा गुन्हा केल्याचे कबुल केले आहे. त्यांनी याचसारखे गुन्हे महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यामध्ये केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

    वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली ही कामगिरी सपोनि विशाल वायकर, पोलीस उपनिरीक्षक गणेश माने, संतोष नाळे, श्रीनाथ कदम, अंकुश इवरे, अनिल भोसले, शौकत सिकिलकर, महेंद्र सपकाळ, संजय जाधव, अविनाश शिंदे, सागर धेंडे, अभिजित घनवट, विठ्ठल काळे, नाना होले, ज्ञानदेव साबळे, शशिकांत गार्डी, शिवाजी सावंत, चालक विजय शिंदे यांनी केली आहे. या गुन्हयाचा पुढील तपास गणेश माने हे करत आहेत.