वर्षाअखेर पीएमपीएमएलच्या ताफ्यात दाखल होणार २ हजार बसगाड्या

पीएमपीएमएल स्वमालकीच्या १ हजार १४७ बसगाड्या शिल्लक राहतील. सध्या १ हजार ३१ वाहक तर, १ हजार ३४ चालकांचा अतिरिक्त बोजा पीएमपीएमलवर आहे. पीएमपीएमलकडील वाहक - चालकांची संख्या विचारात घेता नवीन वाहक - चालकांची आवश्यकता नसल्याचा स्पष्ट अभिप्राय अध्यक्ष डॉ.राजेंद्र जगताप यांनी दिला आहे.

    पिंपरी: पीएमपीएमएलच्या ताफ्यात सध्या १४७५ बसगाड्या आहेत. तर, ४२८२ वाहक आणि ३१५९ चालक कार्यरत आहेत. कोरोना महामारीमुळे पीएमपीएमलच्या दैनंदिन उत्पन्नात घट झाली आहे. त्यामुळे वाहक – चालक, क्लिनर पदाची भरती प्रक्रिया रद्द करण्यात आली आहे. मात्र, डिसेंबर २०२१ अखेर पीएमपीएमलच्या ताफ्यात २००० बसगाड्या येतील. त्यावेळी वाहक – चालक आणि क्लिनरची आवश्यकता भासेल. अ‍ॅटोमेटिक फेअर कलेक्शन, तिकीट इश्यु यंत्रणेचा वापर केल्यास वाहकांच्या संख्येवर नियंत्रण येऊन खर्च वाचेल, असा दावा पीएमपीएमएलचे तत्कालीन अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक डॉ.राजेंद्र जगताप यांनी केला आहे.

    सन २०१६ – १७ मधील वाहक – चालक आणि क्लिनर भरती प्रक्रिया रद्द केल्याबाबत आणि २ हजार बसगाड्यांसाठी लागणाऱ्या कर्मचारी संख्या नियोजनाबाबत डॉ. राजेंद्र जगताप यांनी संचालक मंडळाला अवगत केले आहे. त्यात म्हटले आहे की, संचालक मंडळाच्या १२ डिसेंबर २०१६ च्या ठरावानुसार बदली कंडक्टर (एकूण ४९००), बदली ड्रायव्हर (एवूâण २४४०) आणि बदली क्लिनर (एवूâण ७००) या पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली. ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविणे, ऑनलाईन परिक्षा घेणे, उत्तरपत्रिका तपासणे, गुणवत्ता यादी बनविणे, आदी कामकाज मेसर्स महाऑनलाईन संस्थेमार्फत करण्यात आले. पीएमपीएमलच्या आवश्यकतेनुसार, ६६१ बदली वाहक, १२२९ बदली चालक आणि ११० बदली क्लिनर यांना सेवेत रुजू करुन घेण्यात आले. तर, एक वर्षाहून अधिक कालावधी लोटल्याने २७ नोव्हेंबर २० रोजी भरती प्रक्रिया रद्द करण्यात आली.

    आजमितीला पीएमपीएमलच्या ताफ्यात १ हजार ४७५ बसगाड्या आहेत. त्यापैकी दररोज १३०० गाड्या मार्गावर पाठविण्यात येतात. एवूâण ४ हजार २८२ वाहक , ३१५९ चालक सध्या कार्यरत आहेत. दररोज १३०० बसगाड्यांचा विचार करता ३२५० वाहक आणि २१२५ चालकांची आवश्यकता आहे. कोरोना विषाणू प्रादुर्भावामुळे बसगाड्यांचे पुर्ण क्षमतेने संचलन सुरु झालेले नाही. कोरोना महामारीमुळे पीएमपीएमलच्या दैनंदिन उत्पन्नात घट झाली असून आर्थिक परिस्थिती बिकट बनली आहे. अनुवंâपा तत्त्वावरील १०५ उमेदवार वाहक – चालक, क्लिनर पदासाठी प्रतिक्षेत आहेत.

     

    पीएमपीएमएल स्वमालकीच्या १ हजार ४७५ बस आहेत. त्या पैकी ३२१ बस या अकरा ते बारा वर्षा दरम्यानच्या तर ७ बस १२ वर्षापुढील आहेत. शासन निर्णयानुसार त्या भंगारात काढाव्या लागणार आहेत. त्यामुळे पीएमपीएमएल स्वमालकीच्या १ हजार १४७ बसगाड्या शिल्लक राहतील. सध्या १ हजार ३१ वाहक तर, १ हजार ३४ चालकांचा अतिरिक्त बोजा पीएमपीएमलवर आहे. पीएमपीएमलकडील वाहक – चालकांची संख्या विचारात घेता नवीन वाहक – चालकांची आवश्यकता नसल्याचा स्पष्ट अभिप्राय अध्यक्ष डॉ.राजेंद्र जगताप यांनी दिला आहे.मात्र, भविष्यात पीएमपीएमएल मालकीच्या आणि खासगी ठेकेदारांकडील बसताफ्यात वाढ झाल्यास वाहक – चालक आणि क्लिनर सेवकांची संख्या टप्प्याटप्प्याने वाढवावी लागणार आहे. आधुनिकीकरण आणि तंत्रज्ञानाचा उपयोग करुन ऑटोमेटीक फेअर कलेक्शन आणि तिकीट इश्यु यंत्रणेचा वापर वाढविल्यास वाहकांच्या संख्येवर नियंत्रण येईल. खर्चही नियंत्रणात ठेवणे शक्य होईल, असेही जगताप यांनी प्रस्तावात नमूद केले आहे.