कंपनीच्या गोडाऊनमधून १५ हजारांच्या कॅडबरीची चोरी;

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी शेख हे बिग बास्केट कंपनीत एच आर मॅनेजर पदावर काम करतात. त्यांच्या कंपनीचे खेड तालुक्यातील म्हाळुंगे येथे गोडाऊन आहे. त्या गोडाऊन मध्ये उघड्या दरवाजातून आरोपी अजय याने शुक्रवारी पहाटे पाच वाजताच्या सुमारास प्रवेश केला.

पिंपरी: बिग बास्केट कंपनीच्या म्हाळुंगे येथील गोडाऊन मधून एका १९ वर्षीय तरुणाने १५ हजार ८४३ रुपयांच्या कॅडबरी चोरल्याची घटना नुकतीच घडली. या प्रकरणी अजय संतोष चव्हाण (वय १९, रा.जाधववाडी, चिखली) तरुणाच्या विरोधात चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत वशीम तयबली शेख (वय३४, रा. विश्रांतवाडी, पुणे) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी शेख हे बिग बास्केट कंपनीत एच आर मॅनेजर पदावर काम करतात. त्यांच्या कंपनीचे खेड तालुक्यातील म्हाळुंगे येथे गोडाऊन आहे. त्या गोडाऊन मध्ये उघड्या दरवाजातून आरोपी अजय याने शुक्रवारी पहाटे पाच वाजताच्या सुमारास प्रवेश केला. गोडाऊनमधून १५ हजार ८४३ रुपये किमतीच्या नेसले, डेअरीमिल्क, अमूल कंपनीच्या कॅडबरी चोरून नेल्या. चाकण पोलीस तपास करीत आहेत.