करंदीत बिबट्याला पकडण्यासाठी लावला पिंजरा

शिक्रापूर : करंदी (ता. शिरूर) येथे दोन दिवसांपूर्वी बिबट्याचे हल्ले वाढत आहेत. त्यामुळे बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिक करत होते. अखेर वनविभागाने बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरा लावला असल्यामुळे ग्रामस्थांमधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

 ग्रामस्थांमधून व्यक्त केले समाधान

 शिक्रापूर :  करंदी (ता. शिरूर)  येथे दोन दिवसांपूर्वी बिबट्याचे हल्ले वाढत आहेत. त्यामुळे बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिक करत होते.  अखेर वनविभागाने बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरा लावला असल्यामुळे ग्रामस्थांमधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
 
                     करंदी (ता. शिरूर)  काही दिवसांपासून बिबट्याचे दर्शन होत असताना गुरुवारी सायंकाळच्या सुमारास येथील सुर्यकांत दरेकर यांच्या पाळीव कुत्र्यावर बिबट्याने हल्ला केला.  यावेळी दरेकर यांनी मोठ्याने आरडाओरडा केल्याने बिबट्या शेजारील शेतामध्ये पळून गेला.  मात्र बिबट्याच्या हल्ल्यामध्ये कुत्र्याच्या तोंडाला आणि पायाला दुखापत झाली. गावातील ग्रामसुरक्षा यंत्रणेद्वारे सामाजिक कार्यकर्ते महेश साबळे यांनी ग्रामस्थांना माहिती देत सतर्कतेचे आवाहन केले. या भागातील शेतकरी व ग्रामस्थ भयभीत झाले.  तर या परिसरामध्ये उसाचे क्षेत्र जास्त असल्यामुळे या भागामध्ये शेतीमध्ये काम करणाऱ्या महिला व शेतकरी भयभीत झाले व बिबट्याचे प्राण्यांवर हल्ले होऊन लागल्याने बिबट्याचा वनविभागाने बंदोबस्त करावा अशी मागणी ग्रामस्थ करत असताना आज शिरूर वनपरिक्षेत्र अधिकारी मनोहर म्हसेकर यांच्या मार्गदर्शनाखाली वन कर्मचारी आनंदा हरगुडे यांनी त्याठिकाणी पिंजरा लावला आहे. यावेळी दिलीप ढोकले,  सुर्यकांत दरेकर, संभाजी पांगारकर, गौरव ढोकले, सुभाष शिंदे, शिवाजी दरेकर, राजेंद्र ढोकले, रमेश नप्ते, अक्षय ढोकले, दादा दरेकर, बबन दरेकर यांसह आदी उपस्थित होते, तर ग्रामस्थांच्या मागणीनुसार वनविभागाने दोनच दिवसात येथे पिंजरा लावण्याने ग्रामस्थांनी देखील समाधान व्यक्त केले.