भांडवली कामांना १० टक्के कात्री लागणार

महापालिकेच्या सत्ताधारी नगरसेवक नाराज पुणे: महापालिकेच्या भांडवली कामांना १० टक्के कात्री लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे आता ज्या पदाधिकारी आणि नगरसेवकांना जास्त तरतूद मिळाली

महापालिकेच्या सत्ताधारी नगरसेवक नाराज
पुणे:
महापालिकेच्या भांडवली कामांना १० टक्के कात्री लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे आता ज्या पदाधिकारी आणि नगरसेवकांना जास्त तरतूद मिळाली होती.त्यांच्या कामांना कात्री लागणार आहे. यामुळे भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी बुधवारी महापौर मुरलीधर मोहळ यांच्याकडे नाराजी व्यक्त केली. गेल्या तीन महिन्यापासून शहरात कोरोनाचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव सुरू आहे.याचा परिणाम थेट महापालिकेच्या उत्पन्नावर झाला आहे.महापालिकेच्या मुख्य स्रोत असलेल्या मिळकत विभागाचे उत्पन्न घातले आहे.महापालिका बांधकाम विभागाला गेल्या दोन महिन्यामध्ये केवळ १ कोटी उत्पन्न मिळाले आहे. जीएसटीचे सुध्दा कमी पैसे येत असल्यामुळे महापालिकेची आर्थिक कोंडी झाली आहे.आशा परिस्तिथीमद्ये आयुक्त शेखर गायकवाड यांनी अंदाजपत्रकाला कात्री लावण्याचा निर्णय घेतला आहे.

– महापालिकेला २०० कोटी मिळणार
अंदाजपत्रकातील भांडवली कामांना १० टक्के कात्री लागणार आहे.यामधून महापालिकेला २०० कोटी रुपये मिळणार असून याचा उपयोग कोरोनासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजनासाठी करण्यात येणार आहे.

महापालिकेच्या अंदाजपत्रकात नगरसेवकांनी सुचवलेल्या स यादीचा समावेश हा भांडवली कामात असतो.त्यामुळे सध्या तरी याकामाला १० टक्के कात्री लागणार आहे.पुढील काळात उत्पनाचा अंदाज घेऊन आणखी कात्री लागू शकते. ज्या पदाधिकारी नगरसेवकांना अंदाजपत्रकात कोट्यवधी रुपयांची कामे मिळाली आहेत. याचा फटका या नगरसेवकांना बसू शकतो. स्थायी समितीचे सभासद आणि पदाधिकारी याना जास्त प्रमाणात निधी कमी होईल. ज्या नगरसेवकाला अंदाजे १० कोटी तरतूद असेल त्यांचे १ कोटी कमी होणार आहेत. ज्या नगरसेवकांना कमी तरतूद मिळाली आहे, त्यांना या निर्णयाचा जास्त फटका बसणार नाही.