मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर कार जळून खाक 

मुद्दतरसर शेख  कारमधून (एम एच ०२ सी एच  ९३८७)  पुण्याच्या दिशेने जात होते. कार कामशेत बोगद्याच्या अलिकडे किमी ६९ जवळ गाडी आली असता, गाडीमधून अचानक धूर येऊ लागला. ही बाब लक्षात येताच त्यांनी तत्काळ गाडी बाजुला घेतली. गाडीमधून सर्वजण बाहेर आले.

    वडगाव मावळ/कामशेत : मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर कार जळून खाक झाली. कारमधील  प्रवासी सुखरुप बाहेर पडण्यात यशस्वी ठरले. त्यामुळे सुदैवाने मोठी दुर्घटना टळली.

    मिळालेल्या माहितीनुसार, मुद्दतरसर शेख  कारमधून (एम एच ०२ सी एच  ९३८७)  पुण्याच्या दिशेने जात होते. कार कामशेत बोगद्याच्या अलिकडे किमी ६९ जवळ गाडी आली असता, गाडीमधून अचानक धूर येऊ लागला. ही बाब लक्षात येताच त्यांनी तत्काळ गाडी बाजुला घेतली. गाडीमधून सर्वजण बाहेर आले. यानंतर काहीच क्षणात गाडीने पेट घेतला. घटनेची माहिती मिळतात देवदूत यंत्रणेने तातडीने घटनास्थळी धाव घेऊन आग विझवली. मात्र तोपर्यंत कार जळून खाक झाली होती.