Cardelia Cruise Drugs Case: Witness Who Selfie With Aryan Khan Revealed Crime filed in Pune, Palghar

कार्डेलिया क्रुझ रेव्ह पार्टी(Cardelia Cruise Drugs Case) प्रकरणात अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खानसोबत (Aryan Khan Drugs Case) एनसीबीच्या कार्यालयात सेल्फी घेतल्यानंतर व्हायरल झालेल्या फोटोमुळे चर्चेत आलेला किरण गोस्वामीचे गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेला ‘कारनामा’ समोर आला आहे. आर्यन खानसोबत सेल्फी घेतला आणि गोसावी तिथेच फसला. किरण गोसावी विरोधात पुणे पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे.

    पुणे : कार्डेलिया क्रुझ रेव्ह पार्टी(Cardelia Cruise Drugs Case) प्रकरणात अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खानसोबत (Aryan Khan Drugs Case) एनसीबीच्या कार्यालयात सेल्फी घेतल्यानंतर व्हायरल झालेल्या फोटोमुळे चर्चेत आलेला किरण गोस्वामीचे गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेला ‘कारनामा’ समोर आला आहे. आर्यन खानसोबत सेल्फी घेतला आणि गोसावी तिथेच फसला. किरण गोसावी विरोधात पुणे पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे.

    अभिनेता शाहरुख खानच्या मुलावर क्रूझवर झालेल्या कारवाईत सहभागी असणाऱ्या किरण गोसावी विरोधात पुणे पोलिसांनी लुकआऊट नोटीस जारी केली आहे. पुण्यातील फरासखाना पोलीस ठाण्यात किरण गोसावी याच्यावर 2018 मध्ये फसवणूकीचा गुन्हा दाखल आहे.

    गोसावी याने फेसबुकद्वारे एका तरुणाला मलेशियात नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून 3 लाख रुपयांना गंडा घातला आहे. त्यानुसार 29 मे 2018 रोजी त्याच्यावर हा गुन्हा दाखल आहे. मात्र त्यानंतर तो फरार झाला होता. तो सापडत नसल्याने त्याला फरार म्हंटले होते.

    दरम्यान आर्यन खान याच्यावर क्रूझवर ड्रग्स पार्टीप्रकरणात एनसीबीने कारवाई केली. त्यादरम्यान हा किरण गोसावी त्याच्यासोबत दिसून आला होता. तसेच त्याने आर्यन खानसोबत एक सेल्फी देखील काढला होता. त्याप्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेऊन किरण गोसावी याच्यावर आरोप केले होते. त्यामुळे कारवाईवरच संशय निर्माण झाला होता. दरम्यान एनसीबीने किरण याला पंच म्हणून नेल्याचे स्पष्ट केले होते. त्यावेळपासून किरण गोसावी चर्चेत आला होता.

    दरम्यान पुणे पोलिसांनी आता त्याच्यावर मोठी कारवाई करत त्याच्याविरोधात लुकआऊट नोटीस काढली आहे. तो परदेशात पळून जाण्याची शक्यता गृहीत धरली असून, त्याने कोठेही जाऊ नये, यासाठी ही नोटीस काढली आहे.