आळेगावात जनावरे, मांस पकडले

नारायणगाव : आळेफाटा पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलिसांनी छापा टाकून आळे गावात ३ गोवंश जनावरे व ६४० गोमांस व एक पिकअप असे ८ लाख ३० हजार किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे , अशी

 नारायणगाव : आळेफाटा पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलिसांनी छापा टाकून आळे गावात ३ गोवंश जनावरे  व  ६४० गोमांस व एक पिकअप  असे ८ लाख ३० हजार किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे , अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक टी वाय मुजावर यांनी दिली . या १५ दिवसातील आळेफाटा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दुसरी मोठी कारवाई आहे .

 आळे गावातील खलिद बेपारी आणि त्याचा भाऊ एजाज बेपारी  ( दोघेही रा आळे ता जुन्नर जि.पुणे)  व चालक एजाज खालिद यांच्यावर  पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे .आळेफाटा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक टी वाय मुजावर यांना काल दि १६ रात्री ८ वा सुमारास मिळालेल्या माहितीनुसार आळे गावातील खलिद अहमद गुलामगौस बेपारी ,खलिद अहमद गुलामगौस  बेपारी ( दोघेही रा आळे ता जुन्नर जि.पुणे)  हे दोघेजण त्यांच्या आळे गावामधील घराजवळून चालक  एजाज खालिद यांच्या बरोबर पिक अप गाडी (  एम एच -०४ जे यू ०३२९) मधून मुंबईकडे गोमांस व काही जनावरे विक्रीसाठी घेऊन जाणार असल्याची खबर आळेफाटा पोलिसांना मिळाली होती.  या माहितीवरुन आळेफाटा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक टी वाय मुजावर , पोलीस उप निरीक्षक डौले ,पोलीस हवालदार नरेंद्र गायकवाड ,महेश पठारे ,निलेश कारखिले ,गोविंद हेंद्रे ,अशोक फालके ,पांडुरंग साबळे ,महिला पोलीस फापाळे ,भालेकर या पथकाने छापा टाकून १ लाख १८ हजार किमतीचे ६४० गोमांस ,१२ हजार किमतीचे दोन गोवंश जनावरे ,व ७ लाख किमतीची पिक अप गाडीअसे एकूण ८ लाख ३० हजार किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे .या  पुढील तपास आळेफाटा पोलिस करत आहे .