गोमांस वाहतूक करणारा ट्रक पकडला

बेल्हे: कल्याण-अहमदनगर महामार्गा वर पुणे-अहमदनगर जिल्ह्याच्या सरहद्दीवर असलेल्या काळवाडी चेकनाक्यावर पारनेर पोलिसांनी गोमांस वाहतूक करणारा ट्रक पकडण्याची कारवाई सोमवारी पहाटे केली. याप्रकरणी पारनेर पोलीस ठाण्यात संगमनेर येथील ट्रक चालक अनिल भाऊसाहेब मंडलिक,वाहक गौतम दामोधर झालटे या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले. याबाबत पारनेर पोलीस ठाण्याच्या पोलीस सूत्रांकडून समजलेली हकीकत अशी,कल्याण-अहमदनगर महामार्गावर पुणे-अहमदनगर जिल्ह्याच्या सरहद्दीवर असलेल्या काळेवाडी चेक नाक्यावर पारनेर पोलीस वाहनाची तपासणी करत आसताना एक लाल रंगाचा आयशर ट्रक (क्र. एम. एच.०४,जे.यु.३७२५)मध्ये गोवंश मांस वाहतूक करताना आढळून आले.संगमनेर येथील ट्रक चालक अनिल भाऊसाहेब मंडलिक, वाहक गौतम दामोधर झालटे या दोघांना ताब्यात घेऊन गोमांस व ट्रक असा सहा लाख ९९ हजार रुपयांचा माल त्यांच्या कडून पोलीसांनी हस्तगत केला.