सुशांतसाठी सीबीआयचा तपास, मग चैत्रालीसाठी का नाही ?

चैत्राली ज्या कॉलेजमध्ये शिकत होती, त्या कॉलेजच्या प्रमुखांचे राजकीय लागेबांधे आहेत. महाराष्ट्रातील बड्या राजकीय दबावामुळे पोलीस या प्रकरणाची चौकशी करत नसल्याचा आरोप तिच्या आई वडिलांनी केला आहे. सुशांतला जर न्याय मिळाला असं म्हटलं जात असेल तर चैत्रालीला न्याय कधी मिळणार? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

पुणे : अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यूचा तपास सुप्रीम कोर्टाने सीबीआयकडे सोपवला आहे आणि आम्ही सामान्य नागरिक आहोत, आमच्या प्रकरणाचा राजकीय फायदा नसल्याने हे प्रकरण सीबीआयकडे दिले जात नाही का? असा सवाल एका सामान्य कुटुंबातील आयुर्वेद डॉक्टर चैत्राली कुलकर्णी हिच्या पालकांनी केला आहे. चैत्राली हिचा चार वर्षांपूर्वी संशयास्पद मृत्यू झाला होता. तसेच तिच्या मृत्यूची चौकशी होऊन तिच्या मृत्यूला जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई व्हावी, अशी मागणी तिचे कुटुंबीय करत आहेत.

चैत्राली कुलकर्णी ही वाघोली येथील एका महाविद्यालयात एमडीच्या दुसऱ्या वर्षात शिकत होती. महाविद्यालयात गैरप्रकार चालतात हे चैत्रालीला कळल्यावर तिने याविरोधात आवाज उठवला आणि त्यानंतर २०१६ तिचा संशयास्पद मृतदेह खडकवासला धरणात तरंगताना आढळला. मात्र, यानंतर या संपूर्ण प्रकरणाची दखल घेण्यास पोलिसांनी तब्बल ११० दिवस लावले आणि त्यानंतर तक्रार नोंदवली.

चैत्राली ज्या कॉलेजमध्ये शिकत होती, त्या कॉलेजच्या प्रमुखांचे राजकीय लागेबांधे आहेत. महाराष्ट्रातील बड्या राजकीय दबावामुळे पोलीस या प्रकरणाची चौकशी करत नसल्याचा आरोप तिच्या आई वडिलांनी केला आहे. सुशांतला जर न्याय मिळाला असं म्हटलं जात असेल तर चैत्रालीला न्याय कधी मिळणार? असा प्रश्न उपस्थित होत आहे. त्यामुळे सुशांतसिंह राजपूत प्रमाणे चैत्रालीच्या मृत्यूची चौकशी देखील सीबीआय मार्फत करण्यात यावी. अशी मागणी चैत्रालीच्या आई-वडिलांनी केली आहे.