वृक्षारोपण करून केला वाढदिवस साजरा

रावणगाव : कारंजा तालुक्यातील ग्राम काजळेश्वर येथील रेखा लांडे यांच्या वाढदिवसानिमित्त नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्थेच्यावतीने कारंजा येथे महावीर कॉलनी येथील गजानन महाराज

 रावणगाव : कारंजा तालुक्यातील ग्राम काजळेश्वर येथील रेखा लांडे यांच्या वाढदिवसानिमित्त नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्थेच्यावतीने कारंजा येथे महावीर कॉलनी येथील गजानन महाराज मंदिरच्या परिसरात १० वृक्षाची लागवड करण्यात आली.या झाडांच्या संगोपन करण्याची जबाबदारी  नेफडो तालुका सचिव यांनी वाढदिवसानिमित्त घेतली.  यावेळी संस्थेच्या राज्य महिला अध्यक्ष नीता लांडे पंचायत समितीच्या वर्षा ठाकरे , सीमा उईके, सुरेश लांडे माधुरी लांडे, निमेष लांडे, पार्थ लांडे,  दिगंबर लांडे उपस्थित होते. नीता लांडे यांनी वाढदिवसानिमित्त भेट म्हणून वृक्ष दिले आणि  रेखा लांडे यांनी त्या वृक्षाचे संगोपन करायचे आश्वासन दिले.  त्यानंतर काजळेश्वर येथे बेबी अंबोरे व प्रदीप उपाध्ये यांनीसुद्धा भेट म्हणून वृक्ष देऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.