केंद्र सरकारचे कृषी विधेयक शेतकरीविरोधी

शिरुर तालुका कॉंग्रेसकडून निषेध : तहसीलदारांना निवेदन
शिक्रापूर : केंद्र शासनाने संसदेत मंजूर केलेली विधेयके शेतकरी विरोधी असल्याने ते त्वरित मागे घेण्यात यावे,अशी मागणी शिरुर तालुका काँग्रेसच्या वतीने करण्यात आली असून याबाबतचे निवेदन शिरूरच्या तहसीलदारांना देण्यात आले आहे.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण महाराष्ट्रभर केंद्र सरकारने जी विधेयक राज्यसभा आणि लोकसभेमधील घाईगडबडीत पास करून घेतली ती शेतकरी विरोधी असून संपूर्ण शेतकरी वर्ग त्याठिकाणी देशोधडीला लागणार आहे म्हणून संपूर्ण महाराष्ट्रभर काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून जिल्हा स्तर आणि तालुका तालुकास्तरावर करोनाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टंसिंग चे पालन करून शांततेच्या मार्गाने आंदोलन करण्यात आले. पुणे जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आमदार संजय जगताप यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण जिल्ह्यामध्ये काँग्रेस पक्षाच्या वतीने केंद्र शासनाच्या विरोधात शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी आंदोलन करण्यात येत आहे. याचाच एक भाग म्हणून शिरूर तालुका काँग्रेसच्या वतीने पुणे जिल्हा काँग्रेस कमिटीचे खजिनदार महेश ढमढेरे यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदारांना निवेदन देऊन या विधेयकाचा निषेध करण्यात आला.
– शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी आंदोलन
यावेळी शिरूर तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष वैभव यादव, शिरूर शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष किरण आंबेकर, शिरूर शहर महिला काँग्रेसच्या अध्यक्ष ज्योती हांडे, उपाध्यक्ष शितल आनंदे, कल्पना पुंडे, शिरूर शहर युवक अध्यक्ष अमजद पठाण, पापाभाई पठाण, शिरूर आंबेगाव विधानसभा अध्यक्ष यशवंत पाचंगे, विजय डिंबर, उमेश काळे, फैजल शेख, अभय सुराणा, प्रदीप मेहकरे, आदी पदाधिकारी उपस्थित होते.