रस्त्यावरील अपघात रोखण्यासाठी केंद्र सरकारचा ‘मेगा प्लॅन’

चेन्नई येथील आयआयटी, एनआयसीच्या वतीने हे वेबपोर्टल तयार करण्यात आले असून, यामध्ये अपघातांची माहिती नमूद करता येणार असून, अपघाताची कारणे शोधणे आणि त्याबाबतच्या उपाययोजना सुचवून त्यासंदर्भात अंमलबजावणी करणे आदींसाठी वेबपोर्टलची मदत होणार आहे

पुणे – देशातील रस्त्यांवरील होणाऱ्या रस्ते अपघातांची (Road accidents) वाढती संख्या लक्षात घेता केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने (Central government)  ‘वेब पोर्टल’ (web portal)तयार केले आहे. याबाबत सध्या अपघातांसंबंधी विविध विभागांच्या अधिकाऱ्यांनी प्रशिक्षण देण्यात येत आहे. यासह येत्या काळात अपघात रोखण्याबाबत ऍपचा प्रत्यक्ष वापर करण्यात येणार आहे.

चेन्नई येथील आयआयटी, एनआयसीच्या वतीने हे वेबपोर्टल तयार करण्यात आले असून, यामध्ये अपघातांची माहिती नमूद करता येणार असून, अपघाताची कारणे शोधणे आणि त्याबाबतच्या उपाययोजना सुचवून त्यासंदर्भात अंमलबजावणी करणे आदींसाठी वेबपोर्टलची मदत होणार आहे. अपघातांचा अभ्यास आणि त्याबाबतच्या उपाययोजनांसंदर्भात प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून वेबिनारद्वारे प्रशिक्षण देण्यात येत आहे. अपघाताची सविस्तर माहिती, कारण, रेखांकित नकाशे आदींची माहिती अपडेट ठेवण्यासाथी ऍप तयार केले आहे.

मागील काही वर्षांपासून प्रगतशिल देशांमध्ये याप्रकारचे तंत्रज्ञान वापरण्यात येत आहे. येत्या काळात हा उपक्रम राष्ट्रीय स्तरावर राबवण्यात येणार आहे. याबाबत परिवहन विभाग, पोलीस, सार्वजनिक बांधकाम विभाग, आरोग्य विभाग, एनएचएआय, एमएसआरडीसी आदी विभागांतील अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे.